शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी' अपघात : ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 08:16 IST

बॅलन्स कॅन्टीलिव्हर सेगमेंट लाँचिंग करणारी लिफ्ट ही अंदाजे दोन हजार टनांपेक्षा अधिक असते. ही लिफ्ट व ९० टनांचा एक ब्लॉग असे १४ ब्लॉग मिळून एक गर्डर तयार होते. 

पुरुषोत्तम राठोड -घोटी (जि. नाशिक) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीन कोसळून झालेल्या अपघातानंतर गर्डरचा मोठ्या प्रमाणात ढिगारा खाली पडला. तो काढण्याचे काम सोमवारी मध्यरात्रीपासून युद्धपातळीवर सुरू होते. स्थानिक प्रत्यक्षदर्शीच्या मते ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. 

हाहाकार पाहून भावनिक झालो -रात्री एकनंतर मी घटनास्थळाकडे निघालो. पहाटे साडेचारच्या सुमारास घटनास्थळावर पोहोचल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात आली. समोरचे दृश्य अतिशय मन हेलावणारे होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. घटनास्थळी तोपर्यंत रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक, पोलिस, एमएसआरडीएचे अधिकारी, सारी यंत्रणा कामाला लागली होती. क्रेन व पुलाच्या ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले, याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अगोदर बचावकार्य हाती घेणे महत्त्वाचे होते. एकेक व्यक्तीला बाहेर काढले जात असताना त्यावेळी साधारणत: तेरा ते चौदा मृतदेह हाती लागले होते.- दादा भुसे, सार्वजनिक बांधकाममंत्री

१,२६० टनांचा महाकाय गर्डर -बॅलन्स कॅन्टीलिव्हर सेगमेंट लाँचिंग करणारी लिफ्ट ही अंदाजे दोन हजार टनांपेक्षा अधिक असते. ही लिफ्ट व ९० टनांचा एक ब्लॉग असे १४ ब्लॉग मिळून एक गर्डर तयार होते. या गर्डरचे वजन १,२६० टनांपेक्षा अधिक होते. या गर्डरला दोन पिलरवर चढवायचे असल्यास दोन हजार टनांची क्रेन वर लाँच करते. त्यासाठी सुमारे ३० ते ३५ कामगार लागतात. या लिफ्टिंगमध्ये बिघाड होऊन -अर्थात वजन न पेलवल्याने किंवा पावसात काम सुरू असल्याने जमीन खाली खचली असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.

नातेवाइकांचा रुग्णालयात आक्रोश-  गाझीपूर उत्तर प्रदेश येथील परमेश्वर निषाद (वय २४) समृद्धीच्या कामासाठी क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता. -  या अपघातात परमेश्वर मृत्युमुखी पडल्याने त्याचे दोन्ही भाऊ पंकज व प्रिन्स हे रुग्णालयात दाखल झाले असता त्यांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. -  लहान भाऊ गेल्याचे दु:ख अनावर झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील वातावरण सुन्न झाले होते. परमेश्वर अविवाहित होता. लवकरच त्याचे लग्न करायचे होते. -  प्रचंड मेहनती असलेला परमेश्वर उत्कृष्ट क्रेन ऑपरेटर होता. त्याच्या मेहनतीबद्दल सर्वच त्याचे कौतुक करीत असत. मृतांची नावे  -१) अरविंदकुमार उपाध्याय (सुपरवायझर, वय ३३, रा. उ. प्र.)२) गणेश रॉय (कामगार, ४०, रा. पश्चिम बंगाल)३) लल्लन राजभर (कामगार, ३६, उ. प्र.)४) परमेश्वर खेदारूलाल यादव (विंच ऑपरेटर, २७, उ. प्र.)५) प्रदीपकुमार रॉय (हायड्रॉलिक टेक्निशियन, ४४,  बंगाल)६) राजेश शर्मा (हायड्रॉलिक ऑपरेटर, ३२, उत्तराखंड)७) संतोष जैन (सीनियर गॅन्ट्री मॅनेजर, ३६, तमिळनाडू)८) राधेश्याम यादव (कामगार, ३९,  उ. प्र.)९) आनंदकुमार यादव (कामगार, २७,  उ. प्र.)१०) पप्पूकुमार कुलादेव साव (कामगार, ३४, बिहार)११) कानन वैदा रथीनम (पीटी इंजिनीअर, २३, तामिळनाडू)१२) सुब्रोत सरकार (कामगार, २४, पश्चिम बंगाल)१३) सुरेंद्रकुमार पासवान (कामगार, ३८, बिहार)१४) बाळाराम सरकार (सुपरवायझर, २८, प. बंगाल)१५) मनोजसिंह यादव (कामगार, ४९, बिहार)१६) नितीनसिंग विनोदसिंह (कामगार, २५, उ. प्र.)१७) लवकुश रामुदिन साव (कामगार, २८,  बिहार)१८) सत्यप्रकाश पांडे (कामगार, ३०, बिहार)१९) रामाशंकर यादव (कामगार, ४६, उत्तर प्रदेश)२०) सरोजकुमार जगदीशकुमार (कामगार, १८, उत्तर प्रदेश)

जखमी -१) यू. किशोर (इलेक्ट्रिशियन) २) प्रेमप्रकाश (कामगार)३) चंद्रकांत वर्मा (कामगार)

बचावलेले -१) रिऑन कुमार (कामगार)२) पिताबस बिस्वाल (कामगार)३) उपेंद्र पंडित (मेथड इंजिनिअर)४) अभिजित दास (कर्मचारी)५) अन्बुसेल्वन के. (कर्मचारी)

पाऊस, चिखलाचा परिणामअपघातानंतर सुरुवातीला खासगी जीवरक्षक व सरलांबे येथील तरुण अपघातस्थळी मदत कार्यासाठी पोहोचले. त्यानंतर एनडीआरएफचे पथक दुर्घटनास्थळी दाखल झाले. पाऊस व चिखल यामुळे लोखंडी सांगाड्यात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात अडथळा हाेत होता.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातthaneठाणे