शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रित कुटुंब पद्धत काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 00:15 IST

मालेगाव : समाजाच्या विकासासाठी एकत्रित कुटुंब पद्धत व सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम सातत्याने राबविणे काळाची गरज बनली आहे. कालबाह्य ठरू पाहात असलेल्या परंपरेचे जतन होण्यासाठी उत्तर भारतीय ब्राम्हण महिला संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा विजया अवस्थी यांनी केले.

ठळक मुद्देविजया अवस्थी : मालेगाव येथे ब्राह्मण महासंघाचा कार्यक्रम

मालेगाव : समाजाच्या विकासासाठी एकत्रित कुटुंब पद्धत व सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम सातत्याने राबविणे काळाची गरज बनली आहे. कालबाह्य ठरू पाहात असलेल्या परंपरेचे जतन होण्यासाठी उत्तर भारतीय ब्राम्हण महिला संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा विजया अवस्थी यांनी केले.येथील उत्तर भारतीय महिला ब्राह्मण संघटनेतर्फे विठ्ठल मंदिरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना अवस्थी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वसुधा वाजपेयी या होत्या, तर निर्मला वाजपेयी, प्रगती शुक्ला, संगीता त्रिवेदी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या. भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमास प्रारंभ केला गेला. समाजाच्या उत्कर्षासाठी संघटन उभे करीत विविध उपक्रम राबविण्याचा महिला संघटनेचा प्रयत्न अनुकरणीय असल्याचे स्पष्ट करत अवस्थी यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे युवा पिढीवर होत असलेले दुष्परिणाम रोखण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. यावेळी वसुधा वाजपेयी यांनी महिला संघटनेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक मंजू त्रिवेदी यांनी केले. कार्यक्रमास किरण मिश्रा, मंगला मिसर, माया मिसर, सरिता शुक्ला, श्रद्धा तिवारी, मंदा मिसर, श्वेता दुबे, संध्या मिश्रा, अनिता अवस्थी, राजश्री शुक्ला, सोनल मिसर, योगीता मिसर, हेमलता शुक्ला, अर्चना अवस्थी, श्रद्धा वाजपेयी, पूनम मिसर आदींसह महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :MalegaonमालेगांवSocialसामाजिक