हरसूल : पेठ तालुक्याच्या शेवटच्या टोकाच्या अतिदुर्गम भागातील देवीचामाळ येथील रहिवासी आणि नाचलोंढी शाळेत आठवीत शिकत असलेला अजय मनोहर चौधरी (वय १३) हा विद्यार्थी देवीचामाळ गावालगत असलेल्या पारुंडी दहाडावर मित्रांसोबत अंघोळीसाठी गेला असता, बुधवारी (दि.६) दुपारच्यासुमारास बुडाल्याची वार्ता परिसरात पसरली होती. गुरुवारी (दि.७) शोधमोहीम राबविण्यात आली असता, अजयचा मृतदेह दुपारच्यासुमारास बाहेर काढण्यात आला.नाचलोंढी येथील जिल्हा परिषद शाळेत आठवीच्या वर्गात शिकत असलेला अजय मनोहर चौधरी हा दुपारच्यासुमारास आपल्या मित्रांसोबत गावाशेजारील नदीवर अंघोळीसाठी गेला होता. नदीच्या काठावरील खडकावर उडी मारताना खडकावर पडून जखमी अवस्थेत नदीत बुडाल्याची माहिती सोबत असलेल्या इतर मित्रांनी देवीचा माळ ग्रामस्थ व नातेवाईकांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा नदीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. हरसूल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली शोध घेतला असता, रात्री उशिरापर्यंत बुडालेला अजयचा मृतदेह आढळून आला नव्हता.रात्री उशिरा शोधकार्य थांबविण्यात आले. त्यानंतर गुरुवारी चांदोरी (ता. निफाड) येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले होते. पेठ येथील तहसीलदार संदीप भोसले हे विशेष लक्ष ठेवून होते. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन पथकाने अजयचा मृतदेह दुपारी २ वाजेच्यादरम्यान बाहेर काढला. त्यानंतर हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.यावेळी महसूल मंडल अधिकारी आर. व्ही. विधाते, तलाठी यु. आर. चेबाळे, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अध्यक्ष सागर गडाख, किरण वाघ, वैभव जमदाडे, विलास गांगुर्डे, बाळू आंबेकर, केशव झुरळे, पोलीस कर्मचारी नीलेश चौधरी, केशव धूम, विलास जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते
देवीचामाळ येथील बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 22:36 IST
हरसूल : पेठ तालुक्याच्या शेवटच्या टोकाच्या अतिदुर्गम भागातील देवीचामाळ येथील रहिवासी आणि नाचलोंढी शाळेत आठवीत शिकत असलेला अजय मनोहर चौधरी (वय १३) हा विद्यार्थी देवीचामाळ गावालगत असलेल्या पारुंडी दहाडावर मित्रांसोबत अंघोळीसाठी गेला असता, बुधवारी (दि.६) दुपारच्यासुमारास बुडाल्याची वार्ता परिसरात पसरली होती. गुरुवारी (दि.७) शोधमोहीम राबविण्यात आली असता, अजयचा मृतदेह दुपारच्यासुमारास बाहेर काढण्यात आला.
देवीचामाळ येथील बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
ठळक मुद्देशवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात