शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हा रुग्णालयाबाहेर थाटले ‘मिनी बसस्थानक’

By admin | Updated: September 13, 2015 23:07 IST

जिल्हा रुग्णालयाबाहेर थाटले ‘मिनी बसस्थानक’

नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे काही प्रमाणात का होईना निर्बंध शिथील केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांची ने-आण करत असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. ठक्कर बझार, इदगाह मैदान तसेच मेळा बस स्थानक परिसरात बसेसला थांबा देण्यात आला होता. त्र्यंबक नाका पासून पुढे शहरात जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने अनेक बसचालकांनी जिल्हा रुग्णालयासमोर बस थांबवल्याने काहीकाळ ‘मिनी बस स्टॅण्ड’चे स्वरूप निर्माण झाले.इदगाह मैदान आणि ठक्कर बझार, मेळा बसस्थानकाकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने या परिसरात बसेसची गर्दी बघायला मिळाली. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या बसेस तसेच त्र्यंबकेश्वर, धुळे, पुणे आदिं ठिकाणाहूनदेखील बस याच ठिकाणी येत असल्याने या भागात छोटेखानी बसस्थानक असल्याचा भास झाला.शहरातून ठिकठिकाणाहून रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात येत असल्याने तसेच पायी चालणारे भाविकदेखील याच भागातून मार्गक्रमण करत असल्याने याठिकाणी गर्दी बघायला मिळाली. बस हळूहळू पुढे जात असल्याने अनेक बस प्रवाशांनी नियोजित थांब्या आधीच उतरणे पसंत केल्याने बस पुढे नेता येत नसल्याचे चालकांनी सांगितले. प्रशासनाने गर्दीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पहिल्या पर्वणीत कडक नियोजन केले होते, सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर प्रशासनाने बंदोबस्त शिथील केला असला तरी भाविकांनी नियमांचे पालन करून अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)