शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

वडाळ्याच्या महिलांचा थाळीनाद मोर्चा

By admin | Updated: October 13, 2015 00:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराचा निषेध

नाशिक : वडाळागावातील रेशन दुकानदारांकडून महिलांना केली जाणारी अरेरावी थांबवावी व दुकानदारांचे परवाने रद्द करून मक्तेदारी संपुष्टात आणावी, केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा कायद्याचा लाभ द्यावा, अशा एक ना अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी व रेशन दुकानदारांच्या तक्रारींकडे लक्ष वेधण्यासाठी शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला.प्रभाग क्रमांक ५४च्या नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील महेबूबनगर, रंगरेजमळा, गुलशननगर, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, सादिकनगर, पिंगुळबाग, अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील रहिवाशांनी सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभारांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. बी. डी. भालेकर शाळेच्या मैदानावरून सकाळी अकरा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. शालिमार, मेहेर चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. दरम्यान, रशिदा शेख, इरफान शेख, प्रवीण जाधव, नाजमीन शेख आदिंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.आॅगस्ट महिन्यात रेशन दुकानदारांच्या तक्रारींबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना शेख यांनी शिष्टमंडळासह निवेदन दिले होते; मात्र त्याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील रेशन दुकानदारांच्या वागणुकीमध्ये कु ठलाही बदल झाला नाही. परिणामी आज मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.