शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:34 IST

जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच शासकीय व खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या एकूण चार हजार २३० शाळांमध्ये पाच लाख ३७ हजार ५३१ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नाशिक : जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच शासकीय व खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या एकूण चार हजार २३० शाळांमध्ये पाच लाख ३७ हजार ५३१ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  जिल्ह्यातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसह खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप उन्हाळी सुटी संपल्यानंतर दि. १५ जूनला शाळेची पहिली घंटा वाजताच करण्यात येणार आहे. यो योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तक वितरण करता यावे यासाठी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सोमवारी (दि. १६) पाठ्यपुस्तक वितरण करणाऱ्या गाडीचे उद्घाटन केले. अशा प्रकारे पाठ्यपुस्तक भांडारातून थेट तालुक्यापर्यंत ही पुस्तके पाठविली जाणार असून, तेथून शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी संख्येनुसार पाठ्यपुस्तके घेऊन जाण्याचे नियोजन करावयाचे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मराठी माध्यमांच्या पाच लाख २५ हजार ९५१ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातील. तसेच उर्दू माध्यमाचे ९ हजार ६६४, हिंदीचे १६0 व इंग्रजी माध्यमाचे १ हजार ७५६ अशा एकूण पाच लाख ३७ हजार ५३१ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे.  विद्यार्थ्यांची गळती रोखणे व पुस्तकांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाºया विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. परंतु, गेल्या वर्षी ही योजना बंद करून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला होता. मात्र, त्यावर चौफेर टीका झाल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.लाभार्थ्यांनी पुस्तके खरेदी करू नयेजिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांसह शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने शाळांनी नियोजन केले असून, पालकांनी बाजारातून पाठ्यपुस्तकांची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा