शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपली आता गोठेधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:30 IST

शहरातील ज्या गोठेधारकांची मुदत संपली त्यांच्यावर आता तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे केंद्रशासनाचे स्वच्छ शहर सर्वेक्षण संपताच त्या अनुषंघानेदेखील मुकादमांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

नाशिक : शहरातील ज्या गोठेधारकांची मुदत संपली त्यांच्यावर आता तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे केंद्रशासनाचे स्वच्छ शहर सर्वेक्षण संपताच त्या अनुषंघानेदेखील मुकादमांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.महापालिकेच्या हद्दीत अनेक वर्षांपासून गोठे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या तक्रारी करीत असतात. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने गोठे हटविण्यासाठी यापूर्वीच डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली होती तर गोठेधारकांनी आम्हाला जागा द्या, मग शहराबाहेर जातो अशी भूमिका घेतली होती. परंतु त्यावर पुढे काहीच झाले नाही. दरम्यान, ज्या गोठेधारकांना हटविण्याची मुदत संपली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे शहरात अनेक भागांत अस्वच्छतेच्या तक्रारी वाढत आहेत. त्याबाबत आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्यानुसार कर्तव्यात कुचराई करणारे मुकादम अथवा सफाई कामगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, महापालिकेतील गाजलेला २१ कोटी रुपयांचे भूखंड मोबदला प्रकरण तसेच घंटागाडीचा ठेका तसेच कामगारनगर येथील स्वागत हाइट प्रकरणी खातेप्रमुखांना त्याबाबत आढावा घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या तिन्ही विषयांवर स्थायी समिती आणि महापालिकेच्या महासभेत यापूर्वीच वादळी चर्चा झाली आहे. सदरच्या प्रकरणांमध्ये प्रशासनाला चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. परंतु त्यावर कारवाई झालेली नाही.गोठे स्थलांतर रखडलेमहापालिकेमध्ये लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर त्यावेळेपासून म्हणजे सुमारे २५-३० वर्षांपासून शहरातील गोठे अन्यत्र हलविण्याची चर्चा होत आहे. मात्र राजकीय नेत्यांचेच मोठ्याप्रमाणात गोठे असलेले अद्यापही ते शक्य झालेले नाहीत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक