शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील मोरे मळा चौफुलीवर रास्ता रोकोने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:07 IST

मोरे मळा चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात घडत असून, त्यात आतापर्यंत काही जणांचे हकनाक बळी गेले तर अनेक जण जखमी झालेले आहेत. या भागातील वाहतूक नियंत्रणात राहावी यासाठी चौफुलीवर वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी

ठळक मुद्देगतिरोधक, सिग्नलची मागणी : पोलिसांना धक्काबुक्कीआंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नाशिक : हनुमानवाडी-मोरे मळा चौफुली रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे करूनही दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी दहा वाजता परिसरातील शेकडो संतप्त नागरिकांनी रस्त्यावर धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की केल्याने काही काळ तणावही निर्माण झाला. अखेर आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मोरे मळा चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात घडत असून, त्यात आतापर्यंत काही जणांचे हकनाक बळी गेले तर अनेक जण जखमी झालेले आहेत. या भागातील वाहतूक नियंत्रणात राहावी यासाठी चौफुलीवर वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच परिसरात गतिरोधक बसवावेत, अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा केली होती. अशातच मंगळवारी रात्री सुमारास दोघा दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने नागरिकांनी रात्रीच या ठिकाणी गर्दी केली होती. वाहतूक अव्यवस्थेच्या कारणामुळे अपघात घडल्याचा आरोप करीत बुधवारी सकाळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अचानकपणे रस्त्यावर उतरून प्रशासनाने गतिरोधक बसविले नसल्याचे कारण पुढे करत रास्ता रोको केला. रास्ता रोको केल्याने बराच वेळ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. या रास्ता रोकोबाबत पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, गुन्हे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आदींसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांना सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी व गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करून तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. त्यावर पोलीस प्रशासनाकडून यापूर्वी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना त्याचवेळी काही संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलीस कर्मचारी व अधिका-यांशी अरेरावी करून हुज्जत घातली. यावेळी पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी हुज्जत घालणा-या दोन-तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मोरे मळा चौफुलीवर रास्ता रोको झाल्याचे समजतात वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमणूक करणार असल्याचे सांगून प्रशासनाकडे सिग्नल व गतिरोधक बसण्याबाबत पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांनी रास्ता रोको मागे घेतला. सुमारे अर्धा तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक