शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:32 IST

नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एका पुलाच्या बांधकामांसाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत, तर दुसऱ्या पुलासाठी चार निविदा प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देभवानी चौक आणि त्रिमूर्ती चौक साकारण्यासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च येणार

नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एका पुलाच्या बांधकामांसाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत, तर दुसऱ्या पुलासाठी चार निविदा प्राप्त झाल्या आहेत.भवानी चौक आणि त्रिमूर्ती चौक साकारण्यासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महापालिकेत कर्ज प्रकरण गाजल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी कर्ज काढण्याच्या सत्तारूढ भाजपच्या प्रस्तावावर फुली मारली. त्यामुळे भाजपने त्या ऐवजी दोन्ही उड्डाण पूल तूर्तास स्थगित करून ते आर्थिक निधीची उपलब्धता झाल्यानंतर सुरू करण्याची मागणी केली. मात्र, त्यास आयुक्त तयार नाहीत. पुलाचे काम सुरू झाले तरी त्यात नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात त्याचे देयक देण्यात येणार असल्याने आयुक्तांनी पुलाचे काम सुरूच ठेवले. या दोन्ही पुलांसाठी ३० जानेवारी ही निविदा सादर करण्याची अंतिम मर्यादा होती. या कालावधीत दोन्ही पुलांसाठी एकूण सहा निविदा प्राप्त झाल्याने आता या पुलांचा मार्ग मोकळा झाला आहे.निविदांची छाननी करून मार्च महिन्यात त्या अंतिमत: मान्यतेसाठी स्थायी समितीवर सादर केल्या जाणार आहेत, असे शहर अभियंता संजय घुगे यांनी सांगितले. आयुक्तांच्या भूमिकेमुळे महासभेत पुलांच्या ‌स्थगितीचा परस्पर ठराव करूनदेखील कोणत्याही प्रकारचा उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी