शहरात दहा झाडे उन्मळून पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:51+5:302021-05-18T04:16:51+5:30

वादळी वारा : वीजतारांवर फांद्या पडल्याने उडाल्या ठिणग्या ----- नाशिक : शहर व परिसरातील वातावरणावर ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव ...

Ten trees were uprooted in the city | शहरात दहा झाडे उन्मळून पडली

शहरात दहा झाडे उन्मळून पडली

googlenewsNext

वादळी वारा : वीजतारांवर फांद्या पडल्याने उडाल्या ठिणग्या

-----

नाशिक : शहर व परिसरातील वातावरणावर ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव झालेला दिसून आला. सोमवारी (दि.१७) सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहर व परिसरात १८.३ किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहत असल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटल्या. शहर व परिसरात एकूण दहा झाडे रात्री नऊ वाजेपर्यंत कोसळल्याची नोंद अग्निशमन विभागाकडे झाली होती.

नाशिक शहरात सोमवारी पहाटेपासूनच ढगाळ हवामान व सोसाट्याचा वारा सुटला होता. दिवसभर वाऱ्याच्या वेगाने ढगाळ हवामान कायम राहिले. सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाच्या हलक्या सरी शहरांच्या उपनगरांमध्ये कोसळण्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासात १.६ मिलीमीटर इतका पाऊस शहर व परिसरात झाला. दिवसभर वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील सीबीएस, त्रंबकनाका, खडकाळी तसेच पंचवटीतील मालेगाव स्टँड हिरावाडी, कोणार्कनगर त्याचप्रमाणे नाशिकरोड भागातील जेलरोड, चेहडी या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. दिवसभर मनपाच्या अग्निशमन दलाला अलर्टवर ठेवण्यात आले होते. अग्निशमन दलाला घटनेची माहिती जवान बंबासह घटनास्थळी पोहोचून कोसळलेल्या झाडांचा अडथळा दूर करताना दिसून आले. घारपुरे घाटावरील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये झाडांच्या काही फांद्या तुटून पडल्याने शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्या. याबाबत माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी पोहोचले. तसेच वीज कर्मचाऱ्यांनाही येथे पाचारण करण्यात आले होते. तत्काळ या भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला यानंतर जवानांनी तुटलेल्या फांद्या हटविल्या. तसेच रविवार कारंजा येथे यशवंत मंडईच्या भिंतीवर लावलेला लोखंडी फलक कोसळला. सुदैवाने दिवसभरात कोठेही कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही किंवा वाहनांचेही नुकसान झाले नाही. लॉकडाऊन घोषित असल्याने रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता.

Web Title: Ten trees were uprooted in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.