शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सानप यांच्या संस्थेने भरली दहा लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:02 IST

पंचवटीतील गणेशवाडी येथील विद्याभवन इमारतीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेच्या वतीने संचलित वाचनालय आणि अभ्यासिकेच्या थकबाकी संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावल्यानंतर सानप यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश भरल्याने जप्ती टळली आहे.

नाशिक : पंचवटीतील गणेशवाडी येथील विद्याभवन इमारतीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेच्या वतीने संचलित वाचनालय आणि अभ्यासिकेच्या थकबाकी संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावल्यानंतर सानप यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश भरल्याने जप्ती टळली आहे.गेल्या महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर भाजपाने अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याच वेळी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या या संस्थेला महापालिकेने नोटीस बजावल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. अविश्वास ठराव आणल्यानेच सानप यांना नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगली होती.विद्याभवनमध्ये सानप यांच्या संस्थेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर अभ्यासिका आणि वाचनालय चालविले जात असून, त्यात विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक जात असतात. परंतु २०१२ पासून या अभ्यासिका आणि वाचनालयाकडे थकबाकी होती.महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आल्यानंतर सानप यांनी ही सामाजिक संस्था असून, व्यावसायिक नव्हे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याचधर्तीवर सानप यांनी कॉँग्रेसची सत्ता असताना शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन वाचनालयाचा बहुमान केला होता. अशा संस्थांना व्यावसायिक दर लागू करणे हे परवडणारे नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

टॅग्स :MONEYपैसाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका