शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

निळवंडीरोडला फोडली दहा दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:26 IST

दिंडोरी : दिंडोरी शहरात गुरुवारी झालेल्या दुकाने फोडून झालेल्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच रविवारी निळवंडी रोडला दहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहे. हजारो रुपयाची चोरी करण्यात आली असून दुकानाचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. शुक्रवारी रणतळ परिसरात टपरी फोडण्यात आली होती, तर दुचाकी ही चोरी गेल्याची घटना घडली आहे. सातत्याने होणाऱ्या घरफोड्यामुळे नागरिक व व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदिंडोरीत घरफोडयांचे सत्र सुरूच : नागरिक व्यापाऱ्यांमध्ये घबराट

दिंडोरी : दिंडोरी शहरात गुरुवारी झालेल्या दुकाने फोडून झालेल्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच रविवारी निळवंडी रोडला दहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहे. हजारो रुपयाची चोरी करण्यात आली असून दुकानाचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. शुक्रवारी रणतळ परिसरात टपरी फोडण्यात आली होती, तर दुचाकी ही चोरी गेल्याची घटना घडली आहे. सातत्याने होणाऱ्या घरफोड्यामुळे नागरिक व व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सोमवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास दिंडोरी शहरातील निळवंडी रोडवरील स्वामी समर्थ कॉम्प्लेक्समधील कीटकनाशक व शेतीपयोगी औषधी दुकान, ऑटोमोबाईलस, एका दैनिकाचे विभागीय कार्यालय, वकिलांचे ऑफिस त्याचप्रमाणे इतरही दुकान फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून १४,७०० रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दुकानांमधील कॉम्प्युटर व इतर मुद्देमाल चोरी गेला नसला तरी देखील मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान करण्यात आले आहे.दिंडोरी शहरात लागोपाठ घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून या घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे.याबाबत व्यावसायिक सुनील पाटील यांनी दिंडोरी पोलिसात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक मोनिका जेजोट आदी पोलीस कर्मचारी करत आहे. (१३ दिंडोरी चोरी)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे