शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

मनमाड आगारातील आणखी दहा कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 23:52 IST

मनमाड : राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या २४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता मनमाड बस आगारातील आंदोलनकर्त्यांनी संप सुरूच ठेवल्याने या आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे बस प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेत १० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. या निर्णयाने आतापर्यंत या आगारातील २० कर्मचारी निलंबित झाले आहेत.

ठळक मुद्देकारवाई : संप मात्र सुरूच ठेवण्याचा निर्धार

मनमाड : राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या २४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता मनमाड बस आगारातील आंदोलनकर्त्यांनी संप सुरूच ठेवल्याने या आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे बस प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेत १० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. या निर्णयाने आतापर्यंत या आगारातील २० कर्मचारी निलंबित झाले आहेत.एसटीचा संप सुरू असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका ज्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही अशा गोरगरीब जनतेला बसत आहे. खासगी वाहतूकदाराकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. येथील बसस्थानकावर येऊन परत जावे लावत आहे. मात्र, खासगी वाहनधारकांकडून मनमानी भाडेवाढीने सर्वसामान्य माणूस एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे उभा असल्याचे चित्र समोर येत आहे. राज्यात इतर ठिकाणी संप मागे घेण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त येत आहे. मनमाड शहरात मात्र एसटी कामगारांनी एकजुटीने संप सुरूच ठेवला आहे. याआधी येथील १० जणांचे निलंबन केले होते, तर पुन्हा १० जणांचे निलंबन करण्यात आले आहे. आतापर्यंत २३८ कर्मचाऱ्यांपैकी २० कर्मचारी निलंबन झाले आहे.निलंबनाचे आदेश नाशिक विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाले असून मनमाड आगारातील मागे १० आणि आता १० अशा २० कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे. निलबंनाची टागंती तलवार कर्मचाऱ्यांवर आहे.- प्रितम लाडवंजारी, आगार प्रमुख, मनमाडआमचं निलंबन झाले आहे. आमचे सर्व कर्मचारी निलंबित झाले तरी चालेल. मात्र, जोपर्यंत आमचे शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार.- अरुण सांगळे, कर्मचारी. 

टॅग्स :Bus DriverबसचालकStrikeसंप