नाशिक : पाथर्डी फाटा येथील एक रो-हाउस विकल्यानंतर त्याच मालमत्तेवर तब्बल आठ लाखांचे कर्ज काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.येथील साई बाबा निवास रो-हाउस क्रमांक दोन ३० मे २०११ रोजी अमर लहाणू पाटील व दीपक लहाणू पाटील यांना विकले होते. परंतु, रो-हाउसवर नवीन मालकाची नावे उशिराने लागली, याचा गैरफायदा उठवत संशयित संजय सदाशिव देशमुख यांनी जय मल्हार नागरी सहकारी पतसंस्थेकडून तब्बल आठ लाख रुपयांचेकर्ज काढून फसवणूक केली.पाथर्डी फाटा येथे संशयित संजय देशमुख याचे स्वमालकीचे साईबाबा रो-हाउस होते. ते त्यांनी ३० मे २०११ला अमर लहानू पाटील व दीपक लहानू पाटील यांना विकले. परंतु सातबारा उताऱ्यावर अमर व दीपक पाटील यांची नावे उशिरा लागली. याचा गैरफायदा उठवत संजय देशमुख यांनी ४ आॅगस्ट २०११ला जय मल्हार पतसंस्थेत रो-हाउसवर दहा लाख रुपयांचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला.कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पतसंस्थेने त्यांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर देशमुख यांनी ६ आॅगस्ट २०११ ला दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांच्या कार्यालयात गहाणखत नोंदवून दिले. त्यानंतर त्यांनी जय मल्हार पतसंस्थेकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही.
विकलेल्या रो-हाउसवर काढले दहा लाखांचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:49 IST
पाथर्डी फाटा येथील एक रो-हाउस विकल्यानंतर त्याच मालमत्तेवर तब्बल आठ लाखांचे कर्ज काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील साई बाबा निवास रो-हाउस क्रमांक दोन ३० मे २०११ रोजी अमर लहाणू पाटील व दीपक लहाणू पाटील यांना विकले होते. परंतु, रो-हाउसवर नवीन मालकाची नावे उशिराने लागली, याचा गैरफायदा उठवत संशयित संजय सदाशिव देशमुख यांनी जय मल्हार नागरी सहकारी पतसंस्थेकडून तब्बल आठ लाख रुपयांचेकर्ज काढून फसवणूक केली.
विकलेल्या रो-हाउसवर काढले दहा लाखांचे कर्ज
ठळक मुद्देफसवणूक : नोंदणीस विलंबाचा गैरफायदा