सटाणा : रोटरी क्लब आॅफ बागलाण सटाणा विद्यमाने गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक दहा सायकलींचे वाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब आॅफ सटाणाचे अध्यक्ष अभिजित बागड यांनी केले. येथील राधाई मंगल कार्यालयात रोटरी क्लब आॅफ बागलाण सटाणा वतीने समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यायन संस्थेचे अध्यक्ष प्रा. शं. क. कापडणीस होते. या प्रसंगी रोटरी अध्यक्ष अभिजीत बागड म्हणाले की, रोटरी डिस्ट्रीक वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफ त सायकलींचे वाटप करण्यात आले. गत वर्षभरात रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी शालेय विद्यार्थी स्रेहल मोराणकर, निकिता पाटील, निकिता वाघ, संजना गायकवाड, प्रियंका शेवाळे, मयुरी मोरे, छाया गांगुर्डे, स्वाती गांगुर्डे, सविता महाले आदिंना सायकलींचे वाटप केले. याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भालचंद्र बागड, डॉ. प्रकाश जगताप, सीमा सोनवणे, जगदीश कुलकर्णी, प्रा़ बी़जे़ पगार, डॉ़ अमोल पवार, प्रा. बी. डी. बोरसे, बाबुलाल मोरे आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी. डी. बोरसे, महेश देवरे, तुषार महाजन, डॉ. महाले यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा. बी. डी. बोरसे व महेश देवरे यांनी केले. (वार्ताहर)
दहा सायकलींचे वाटप
By admin | Updated: June 2, 2014 01:56 IST