शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 18:53 IST

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगांव फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक झाले. सुदैवाने चौदा प्रवाशांनी वेळीच वाहनातुन बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. शनिवारी सकाळच्या सुमारास इगतपुरी तळेगाव फाट्याजवळ मुंबईहुन भंडारदराकडे जाणारा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरला शॉर्टसर्कीटमुळे अचानक पेट घेतल्याने वाहन जळुन खाक झाले, तर त्यातील चौदा प्रवासी सुखरूप बचावले.

ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्ग : तळेगांव फाटा येथील घटना ; चौदा प्रवासी बचावले

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगांव फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक झाले. सुदैवाने चौदा प्रवाशांनी वेळीच वाहनातुन बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. शनिवारी सकाळच्या सुमारास इगतपुरी तळेगाव फाट्याजवळ मुंबईहुन भंडारदराकडे जाणारा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरला शॉर्टसर्कीटमुळे अचानक पेट घेतल्याने वाहन जळुन खाक झाले, तर त्यातील चौदा प्रवासी सुखरूप बचावले.शनिवारी( दि. १२) सकाळच्या सुमारास मुंबईहुन भरधाव वेगाने येणारा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलर (एम. एच. ४३ एच. ४७५६) ही गाडी चौदा प्रवाशांना घेवुन भंडारदरा येथे सहलीसाठी जात असतांना वाहनात शॉर्टसर्कीट झाल्याने इगतपुरी महामार्गावरील तळेगाव फाटा येथे सकाळी ७ वाजेच्या सुमारात अचानक आग लागली. घटना घडताच या गाडीतील प्रवाशांना टोल प्लाझाच्या कर्मचारींनी सुखरूप बाहेर काढल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही, मात्र टेम्पो ट्रॅव्हलर पुर्णपणे जळुन खाक झाला, अशी माहिती वाहन चालक दादा भिकाजी हानेकर(रा. शिवडी, टिळक नगर, मुंबई) यांनी दिली.या बाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रसंगी इगतपुरी नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तर टोल प्लाझाच्या महामार्ग सुरक्षा पथकाने प्रवाशांना वेळीच वाहनातुन बाहेर काढल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. यावेळी टोल प्लाझाचे रूट पेट्रोलींग अधिकारी जाहिद खान, कंट्रोलरूम अधिकारी राजु चंद्रमोरे, सुरक्षावाहक राजू उघडे, सतीश परदेशी, मुन्ना पवार, वसीम शेख आदी कर्मचारी व इगतपुरी नगरपरिषदेचे अग्नीशामक दलाचे वाहक नागेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवुन वेळीच मदत केल्याने मोठी दुर्घटना टळली, व सर्व प्रवाशी सुखरूप बचावले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ईश्वर गंगावणे हे करीत आहेत.(फोटो १२ इगतपुरी,१)मुंबई महामार्गावर इगतपुरी येथे आग लागलेला टेम्पो ट्रॅव्हलर. आग विझवताना अग्नीशमनदलाचे कर्मचारी. 

टॅग्स :AccidentअपघातTravel Tipsट्रॅव्हल टिप्स