पिंपळगाव बसवंत : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्व. अशोकराव बनकर पुरस्कृत मित्रमंडळाच्या वतीने उभारण्यात आलेले मंदिर व पुतळ्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. महामार्गालगत स्व. अशोकराव बनकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रवाशांची तहान भागविण्यासाठी पाणपोई उभारण्यात आली होती. त्याचप्रमाणे स्व. अशोकराव बनकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता. दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू असल्याने मंदिर, पाणपोई आणि पुतळा स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. अखेर मंदिराच्या स्थलांतराची विधिवत पूजा येत्या रविवारी (दि. १८) करण्यात येणार आहे. दरम्यान, गणेश मंदिरासाठी योग्य जागा उपलब्ध झाली असून, लवकरच गणेश मंदिर उभारण्यात येईल. तोपर्यंत गणेशमूर्ती नांदुर्डी येथील मंदिरात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली.
पिंपळगाव बसवंत येथील मंदिर, पुतळ्याचा अखेर स्थलांतराचा निर्णय
By admin | Updated: May 16, 2014 00:37 IST