शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात एकीने टाळले, दुसरीने तारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 00:59 IST

वासोळ येथील एका निर्दयी मातेने आपल्या एक दिवसाच्या अर्भकाला रस्त्यावर टाकून देण्याची घटना घडल्यानंतर आरोग्य सेवेतील एका माउलीने ममत्वाचे दर्शन घडवत त्या कोवळ्या जीवाला जीवदान दिले. महिलेमधील एक निष्ठुर तर दुसरी मायाळू अशी दोन रूपे तालुकावासीयांना दिसून आली. दरम्यान, संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले  असून,  पित्याचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देबेवारस अर्भकासाठी ग्रामीण रुग्णालयात घडले ममत्वाचे दर्शन

देवळा :  वासोळ येथील एका निर्दयी मातेने आपल्या एक दिवसाच्या अर्भकाला रस्त्यावर टाकून देण्याची घटना घडल्यानंतर आरोग्य सेवेतील एका माउलीने ममत्वाचे दर्शन घडवत त्या कोवळ्या जीवाला जीवदान दिले. महिलेमधील एक निष्ठुर तर दुसरी मायाळू अशी दोन रूपे तालुकावासीयांना दिसून आली. दरम्यान, संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले  असून,  पित्याचा शोध सुरू आहे.सोमवारी (दि. १४) पहाटे वासोळ येथील आदिवासी वस्तीत कुणा अज्ञाताने तासापूर्वी जन्माला आलेल्या एका स्त्री जातीच्या अर्भकाला रस्त्यावर टाकून दिल्याची घटना घडली होती. परिसरातील भटक्या कुत्र्यांनी सदर नवजात शिशूला जखमी केल्यानंतर त्याला उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार सुरू केले; परंतु उपचारांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सर्व जण चिंतित झाले. त्या नवजात अर्भकाला वाचविण्यासाठी मायेची ऊब गरजेची होती. सदर बाब लक्षात येताच देवळा ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी वैशाली कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता मायेच्या ममतेने या अर्भकाची शुश्रूषा केली. गाईचे दूध उपलब्ध करून ते  पाजले, यामुळे उपचारांना प्रतिसाद मिळू लागल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे जाण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता श्रीमती कांबळे स्वतः पुढे आल्या व रुग्णवाहिकेतून बाळाला मालेगावपर्यंत नेले. तेथेही दवाखान्यात दाखल करणे, औषध उपचार व इतर सर्व सोपस्कार पूर्ण होईपर्यंत  बालिकेची देखभाल केली. 

खरेतर अशावेळी थोडेफार अपवाद वगळता प्रत्येक जण जबाबदारी झटकून बाजूला होत असल्याचा अनुभव सर्वश्रुत आहे; परंतु  कांबळे यांनी प्रीती खोटरे यांच्या मदतीने दाखविलेले माणुसकीचे दर्शन सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी