शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

सांगा, आम्ही शिकायचं कसं?

By admin | Updated: September 26, 2014 23:59 IST

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर : विद्यार्थिनींचा संतप्त सवाल

विंचूर : प्रसंग पहिला : येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर भरवस फाट्यावरून घराकडे जात असते. कोपरगावकडे जाणारा ट्रक युवतीजवळ थांबतो. काही कळण्याच्या आत तिला वाहनात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. समयसुचकता दाखवत युवतीने आरडाओरड केल्यामुळे ट्रकचालक वाहनासह पलायन करतो.प्रसंग दुसरा : अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना मोटारसायकलस्वार तिला रस्त्यात अडवतो. मुलीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मुलीच्या किंचाळण्याने मजूर, शेतकरी धाव घेतात. हुल्लडबाजी करणाऱ्या युवकाला जमावाकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले जाते.प्रसंग तिसरा : सायंकाळी साडेपाचला शाळा सुटल्यानंतर बसने प्रवास करणारे विद्यार्थी तिनपाटीवर बसची वाट पाहत थांबतात. बसचालक मुलांना मागून बस येत आहे, या बसमध्ये पास चालत नाही असे सांगून प्रवेश नाकारतात. कित्येक वेळ वाट पाहून बस येत नसल्याचे बघून उशीर झाल्याने काही विद्यार्थी मोटारसायकलस्वारास हात देऊन थांबविण्यासाठी विनंती करीत असल्याचे चित्र दिसून येते.एस.टी. महामंडळाचे अडवणुकीचे धोरण, विद्यालयाच्या आवाराबाहेर हुल्लडबाजी करणारे टोळके व रस्त्यावरील असुरक्षितता यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून, ‘आम्ही शाळेत जायचं का नाही’, असा सवाल उपस्थित केला आहे. एकही मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. कर्मवीर विद्यालयाच्या संकुलात उत्तम शिक्षण मिळत असले तरीही शाळाबाह्य असुविधांमुळे पालकांंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यालयात सुमारे २५००च्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विद्यार्थीसंख्या मोठी असल्याने शालेय प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरीही शाळेच्या बाहेर कंपाउंडजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांना आवर घालता आलेला नाही. टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने संबंधित विभागाला अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. विंचूर मध्यवर्ती गाव असल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बरीचशी मुले बसनेच प्रवास करतात. तथापि, अनेक वेळा बसमध्ये प्रवेश मिळत नसल्याने त्यांचे हाल होत असतात. येवला आगारातील अनेक बसवाहक विद्यार्थ्यांना टाळण्यासाठी नाशिकऐवजी औरंगाबाद अशी पाटी लावत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे.