नाशिकरोड : टाकळीरोड ड्रीमसिटी येथून आगर टाकळी येथे दुचाकीवर जाणाऱ्या युवकास मध्यरात्री अंधारामध्ये तिघा युवकांनी अडवून चाकूचा धाक दाखवत सोनसाखळी, मोबाइल, घड्याळ असा ४१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरी करून पोबारा नेला.रामदास स्वामीनगर सद्गुरू अपार्टमेंटमध्ये राहणारा युवक भगवान उत्तमराव गायकवाड सोमवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास आॅफिसचे काम आटोपून मोटारसायकल (एमएच १५, एफएस ३११६) वरून फेम टॉकीजसमोरील ड्रिमसिटी रस्त्याने जात होता. यावेळी रस्त्यात अंधारात मोटारसायकलवर असलेल्या तिघा युवकांनी भगवान गायकवाड यास अडवून चाकूचा धाक दाखवून बळजबरीने खिशातील पाकिट, हातातील घड्याळ, गळ्यातील सोन्याची चैन, मोबाइल असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने जबरी चोरी करून काढून घेतला. त्यातील एका इसमाने भगवान याने परिधान केलेल्या हेल्मेटच्या काचेवर बुक्का मारल्याने काच फुटून कपाळावर लागून जखमी झाला. खिशातील पॅनकार्ड, सिमकार्ड, ओळखपत्र या वस्तू खाली फेकून दिल्या.यावेळी एका अवजड वाहनाच्या लाईटमुळे तिघा संशयितांनीमाझ्या मोटारसायकलची चावी काढून घेऊन पळ काढला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगर टाकळीत तिघांकडून युवकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:40 IST
टाकळीरोड ड्रीमसिटी येथून आगर टाकळी येथे दुचाकीवर जाणाऱ्या युवकास मध्यरात्री अंधारामध्ये तिघा युवकांनी अडवून चाकूचा धाक दाखवत सोनसाखळी, मोबाइल, घड्याळ असा ४१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरी करून पोबारा नेला.
आगर टाकळीत तिघांकडून युवकास मारहाण
ठळक मुद्देगुन्हा दाखल : ऐवज लुबाडला