शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक प्रश्नांवर प्रथमच भरणार ‘शिक्षक दरबार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 19:40 IST

नाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक प्रश्नांवर शिक्षण विभागात सातत्याने शिक्षकांना चकरा माराव्या लागत असल्याने असे प्रश्न निकाली काढण्यासाठी दि. २३ रोजी नाशिकमध्ये प्रथमच उत्तर ...

ठळक मुद्देदराडे यांचा पुढाकार : उत्तर महाराष्टÑातील शिक्षणाधिकारी उपस्थित राहणारप्रसंगी मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केले जाणार

नाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक प्रश्नांवर शिक्षण विभागात सातत्याने शिक्षकांना चकरा माराव्या लागत असल्याने असे प्रश्न निकाली काढण्यासाठी दि. २३ रोजी नाशिकमध्ये प्रथमच उत्तर महाराष्टÑातील ‘शिक्षक दरबार’ भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शासनदरबारी आणि शिक्षण विभागात शिक्षकांची अनेक प्रकरणे आणि प्रश्न पडून आहेत. यासाठी शिक्षक आणि शिक्षक संघटनांना प्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठवावे लागतात. जिल्हा पातळीवरील विषय तेथेच मिटविणे अपेक्षित असताना विनाकारण शिक्षण उपसंचालक, संचालक कार्यालयाकडे शिक्षकांना चकरा माराव्या लागतात. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने या प्रश्नांना किमान चालना मिळावी आणि सोडवणूकही व्हावी यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शिक्षकांना आपल्या अडीअडचणी मांडण्याची संधी मिळणार आहे.विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यासह सर्व जिल्ह्यांतील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, वेतन पथक, अधीक्षक, नाशिक बोर्डाचे अध्यक्ष तसेच इतर अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार दराडे हे शिक्षकांचे प्रश्न ऐकून ते सोडविण्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणार असून, तत्काळ निर्णय घेण्याबाबत दरबारात प्रयत्न केले जाणार आहेत. जे प्रश्न उपसंचालक पातळीवरचे आहेत त्यासाठी स्वतंत्र बैठक, संचालक पातळीवरचे असतील तर त्यांच्याशी चर्चा आणि त्यानंतरही निर्णय न मिळाल्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे गाºहाणे मांडले जाईल. फारच गरज निर्माण झाल्यास प्रसंगी मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.-- कोट--

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण