शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
6
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
7
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
8
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
9
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
10
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
11
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
12
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
13
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
14
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
15
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
16
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
17
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
18
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
20
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण

शिक्षकांनी गिरविला आॅनलाइन तंत्रज्ञानाचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:26 IST

लखमापूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात तालुक्यातील सर्व शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील रोज शंभर शिक्षक याप्रमाणे गेल्या दहा दिवसांपासून या आॅनलाइन कार्यशाळा संपन्न होत आहेत.

लखमापूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात तालुक्यातील सर्व शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील रोज शंभर शिक्षक याप्रमाणे गेल्या दहा दिवसांपासून या आॅनलाइन कार्यशाळा संपन्न होत आहेत.गटशिक्षणाधिकारी बी.डी. कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी एस. पी. पगार यांच्या सनियंत्रणात कार्यशाळेत सुलभक म्हणून आॅनलाइन कामकाजात सातत्याने सहभाग घेणारे तंत्रस्नेही सुलभक प्रकाश चव्हाण, दत्तात्रय चौगुले, विलास जमदाडे, नौशाद अब्बास यांनी झूममिट, गुगलमिट, जिओमिट, गुगल क्लासरूम, टेलिग्रामवरील नाशिक शिक्षण हेल्पलाइन चॅनल, जिओ चॅट, एमसीईआरटीचे चॅनल तसेच व्हिडिओ कॉलिंग, कॉन्फरन्स कॉलिंग यासंदर्भात आॅनलाइन प्रत्यक्ष डेमो व पीडीएफ दाखवून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन करीत आहेत.प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा विद्या प्राधिकरण, नाशिकच्या प्राचार्या डॉ. वैशाली झनकर, अधिव्याख्याता योगेश सोनवणे, विषयतज्ज्ञ वैभव शिंदे, वाल्मीक चव्हाण, ऊर्मिला उशीर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही कार्यशाळा तालुकास्तरावर आयोजित केल्या आहेत. दिंडोरी पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोस्कर यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, एस. एस. घोलप, एम.एस. कोष्टी, सी. बी. गवळी, एस. पी. पगार, के. पी. सोनार, एस. डी. अहिरे यांच्यासह तालुक्यातील केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, देवराम शार्दूल, परसराम चौरे, शरद कोठावदे, रामदास धात्रक आदी उपस्थित होते.----------------------कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद; परंतु शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत आॅनलाइन कार्यशाळा घेऊन तंत्रज्ञानातील विविध बाबींची माहिती तालुक्यातील सर्वच शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षणातून देण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे.- बी.डी. कनोज, गटशिक्षणाधिकारी, दिंडोरीतंत्रज्ञानविषयक ज्ञानात भर घालणारी कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने अनुभवता आली. कॉन्फरन्स कॉलिंगपासून ते नुकतेच आलेल्या जिओ मिटपर्यंतची माहिती अतिशय सोप्या व सहज पद्धतीने प्रशिक्षक टीमकडून देण्यात आली. याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होईल.- सुनील पेलमहाले, शिक्षक, वाघाड

टॅग्स :Nashikनाशिक