शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे थकीत वेतन मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:36 IST

सपकाळ नॉलेज हबच्या सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असून, संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे करण्यात आली आहे

नाशिक : सपकाळ नॉलेज हबच्या सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असून, संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही विद्यापीठ याप्रकरणाकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे करण्यात आला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र कार्यालयात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचातर्फे दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२५ ते १५० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन जुलै २०१८ पासून थकीत आहे. याप्रकरणी वारंवार अर्ज देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. वेतन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाचे अध्यक्ष श्रीधर देशपांडे, मुकुंद दीक्षित, प्रा. डॉ. मिलिंद वाघ, अरुण धामणे, वासंती दीक्षित, सचिन मालेगावकर, प्रशांत निमये, गणेश शिंदे, प्रा. सचिन गाडेकर आदींनी इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.वेतन थकल्यामुळे शिक्षक व कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. पैशाअभावी शिक्षकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, विमा व कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे या कर्मचाºयांचे कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली असून, कर्मचारी तणावात आले आहे. याप्रकरणी महाविद्यालय व विद्यापीठाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र