शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची अडवणूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:06 IST

शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक : शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालक अशी दोन पदे एकाच अधिकाºयाकडे असल्याने शिक्षकांची दुहेरी अडचण होत असून, शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकपदी त्वरित कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. नाशिक विभागात शालार्थ आयडीच्या सुमारे २ हजार २०० फाईली पेंडिंग होत्या. याविरोधात शिक्षक संघटनांनी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात आंदोलने, मोर्चे काढत त्यांची संख्या साडेचारशेवर आणली आहे. मात्र, नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून या फाईली मार्गी लावायला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून संशय घेतला जात आहे. या स्थितीत शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय, महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी कार्यालय, वेतन पथकाच्या कार्यालयाजवळ मध्यस्थांचा वावर वाढलेला दिसून येत आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद अजूनही रिक्त असून, या पदाचा कार्यभार सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे आहे. महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांची बढती झाल्याने त्यांच्या रिक्त पदाचा कार्यभार उदय देवरे यांच्याकडे आहे. या दोन्ही पदांवर प्रभारी अधिकारी असल्याने शिक्षकांना त्यांच्या समस्यांविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.उपसंचालकांची करावी लागते प्रतीक्षानाशिक विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांतून शिक्षक त्यांच्या समस्या घेऊन येतात. मात्र, उपसंचालक भेटत नसल्याने शिक्षकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. तर शिक्षिकांसोबत लहान बाळेही सोबत असल्याने त्यांची हेळसांड होताना दिसते. शिवाय नाशिकपर्यंत येण्या-जाण्याचा खर्च करूनही अनेकदा उपसंचालकांची भेट होत नसल्याने शिक्षकांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याची तक्रार शिक्षकांमधून दबक्या आवाजात होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र