चांदवड तालुक्यातील शिक्षकांनी जमवला सव्वासहा लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:14 AM2021-05-14T04:14:15+5:302021-05-14T04:14:15+5:30

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी जमवलेल्या निधीतून पाच ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर, सव्वा दोन लाखांच्या फॅबिफ्लु-४०० या गोळ्या तालुक्यातील पाचही ...

Teachers of Chandwad taluka raised Rs | चांदवड तालुक्यातील शिक्षकांनी जमवला सव्वासहा लाखांचा निधी

चांदवड तालुक्यातील शिक्षकांनी जमवला सव्वासहा लाखांचा निधी

Next

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी जमवलेल्या निधीतून पाच ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर, सव्वा दोन लाखांच्या फॅबिफ्लु-४०० या गोळ्या तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या तसेच तालुक्यातील एकूण २३० आशासेविका यांना स्वसंरक्षणासाठी दर्जेदार फेसशिल्ड उपलब्ध करून दिले.

चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी पंकज ठाकरे, गटशिक्षणाधिकारी आर.एन. निकम यांच्या हस्ते सदर साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षकांनी घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण, लसीकरण मदत, कोविड कॉल सेंटर, आयसोलेशन वाॅर्ड या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद‌्गार यावेळी काढण्यात आले. याप्रसंगी शिक्षक नेते काळूजी बोरसे, बाळासाहेब धाकराव, केशव जाधव, शिवाजी शिंदे, सुनील सोनवणे, निवृत्ती आहेर, गंगाधर पगार, किरण जाधव, भाऊसाहेब निकम, संजय खांगळ, कौतिक वाकचौरे, सतीश पाटील, विलास सोनवणे, चंद्रकांत थोरमिसे, यशवंत गवारी, विजय पवार, श्रीकांत देवरे, सतीश अहिरे, रवींद्र जाधव, सतीलाल शिरसाठ, प्रकाश अहिरे, दिनेश ठाकूर आदी शिक्षक उपस्थित होते.

कोट.....

चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी कोरोना परिस्थितीत समाजासाठी एकत्र येऊन केलेली मदत नक्कीच उपयुक्त व प्रेरणादायी आहे.

- महेश पाटील, गटविकास अधिकारी, चांदवड

कोट.....

कोरोना कालावधीत विद्यार्थी हित लक्षात घेता शिक्षकांनी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणासोबत कोरोना संबंधित शासनाने दिलेले कार्य बजावत आहेत. सामाजिक जाणीव म्हणून शिक्षकांनी दिलेले योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे.

- आर.एन. निकम, गटशिक्षणाधिकारी, चांदवड

फोटो- 12 एम.एम.जी.1

चांदवड तालुक्यातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत सुमारे सव्वासहा लाख रुपयांचे आरोग्य साहित्य जमा करून ते गटविकास अधिकारी महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी आर.एन. निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करताना शिक्षक नेते काळूजी बोरसे, सुनील देशमुख, निवृत्ती आहेर आदीसह शिक्षक बांधव.

===Photopath===

120521\374612nsk_36_12052021_13.jpg

===Caption===

फोटो-  12 एम.एम.जी.1चांदवड तालुक्यातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत सुमारे सव्वासहा लाख रुपयांचे आरोग्य साहित्य जमा करुन ते गटविकास अधिकारी महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी आर.एन. निकम,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे यांच्याकडे सुपुर्त करतांना शिक्षक नेते काळुजी बोरसे,सुनील देशमुख,निवृत्ती आहेर आदीसह शिक्षक बांधव. 

Web Title: Teachers of Chandwad taluka raised Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.