शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 18:10 IST

नांदगाव तालुका : शासनाच्या धोरणाचा निषेध

ठळक मुद्देशाळा बंद करण्याचे धोरण सरकार अवलंबत असल्याने याचे दूरोगामी परिणाम राज्याच्या ग्रामीण भागात होणार होतील अशी भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे

नांदगाव : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या २० पेक्षा कमी पट संख्या असणाऱ्या शाळा समायोजित अथवा बंद करू नये या मागणीवर शासन विचार करत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नांदगाव शाखेतर्फे संपूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण सरकार अवलंबत असल्याने याचे दूरोगामी परिणाम राज्याच्या ग्रामीण भागात होणार होतील अशी भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायदा आणून सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न दाखवायचे आणि दुसरीकडे विरोधाभासी धोरणांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, असा प्रकार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे. समितीच्या या आवाहनाला तालुक्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आंदोलनात सहभाग घेत दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. यावेळी संपर्क प्रमुख संजय बच्छाव, शिक्षक नेते राजेंद्र कदम,तालुका अध्यक्ष बोरसे, महिला आघाडी प्रमुख विजया भदाणे,राजकुमार बोरसे,धोंडीराम पठाडे,गौतम पाटील,आर. आर. बोरसे,महेश थोरे,गोसावी, मनोहर हिरे,अविनाश खोंडे, शरद सोनेज,हंसराज बोरसे आदींनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक