शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बोलक्या बाहुल्यांद्वारे ‘शिक्षक आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:42 IST

कसबे सुकेणे/ओझर टाऊनशिप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत बाणगंगानगर शाळेच्या शिक्षिका नलिनी आहिरे यांनी बोलक्या बाहुल्यांद्वारे अध्यापनाचे कार्य सुरू केलेले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. याचाच परिणाम शाळाही बंद आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापनाविषयी निरसता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची शालेय अध्ययन अध्यापनातील रंजकता वाढावी, मुलांना शाळेविषयी गोडी वाटावी यासाठी नलिनी आहिरे यांनी बाहुल्यांद्वारे अध्यापन हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देबाणगंगानगर शाळेचा उपक्रम : विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी वाढविण्यासाठी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे/ओझर टाऊनशिप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत बाणगंगानगर शाळेच्या शिक्षिका नलिनी आहिरे यांनी बोलक्या बाहुल्यांद्वारे अध्यापनाचे कार्य सुरू केलेले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. याचाच परिणाम शाळाही बंद आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापनाविषयी निरसता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची शालेय अध्ययन अध्यापनातील रंजकता वाढावी, मुलांना शाळेविषयी गोडी वाटावी यासाठी नलिनी आहिरे यांनी बाहुल्यांद्वारे अध्यापन हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.मुलांना आपल्यातीलच वाटणाऱ्या पात्रांना नावे देऊन मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल यासारखे विषय नाट्यकरणाद्वारे शिकवायला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, मुलांची आॅनलाइन आॅफलाइन शंभर टक्के उपस्थिती निर्माण व्हावी, गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी विविध बोलीभाषेचा वापर करून व पात्रांना वेशभूषा देऊन त्यांचा वापर अध्यापनामध्ये केल्याने अध्यापन रंजक पद्धतीने होत आहे. कोणत्याही प्रकारचे बाहुल्यांचे प्रशिक्षण न घेता लॉकडाऊनच्या कालावधीचा वेळेचा सदुपयोग करून टाकाऊपासून टिकाऊ अशा विविध प्रकारच्या बाहुल्यांची निर्मिर्ती केली. मुलांना अध्यापन करताना आनंद वाटत आहे कारण बाहुल्या म्हणजे मुलांचा आवडीचा विषय असतो यातूनच त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होत आहे. या अनोख्या शैक्षणिक कार्याला निफाड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास बोरसे, नूतन पवार, रामदास पवार, मुख्याध्यापक संजय पवार यांचे सहकार्य लाभत आहे.बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून कोरोनापासून संरक्षण, लेक वाचवा, बोधपर गोष्टी, वारकरी सांप्रदायातील भजन, शाहिरांचे पोवाडे, शिवाजी महाराजांचा इतिहास स्रीभ्रूणहत्या इत्यादी संदेश देऊनही जनजागृती केलेली आहे. विद्यार्थ्यांपर्यंत अध्ययन-अध्यापनापर्यंत पोहोचण्याचे विविध माध्यम जसे ओट्यावरची शाळा, गूगल मीट, आॅनलाइन शिक्षण व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ, यू-ट्यूब, रेनबो चॅनलच्या माध्यमातून पपेटद्वारे अध्यापनाचे आदर्श पाठांचे प्रक्षेपित होत आहे. यात इयत्तानिहाय व तासिकानिहाय पाठाचे प्रक्षेपण होत आहे. पपेटद्वारे नाट्यकरण पद्धतीने इतिहास विषयाचे पाठ घेतले जात आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे अध्यापन रंजक होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण