शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

टीडीएफ हरली, टीडीएफ जिंकली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:07 IST

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघावर आजवर आपले प्रभुत्व कायम ठेवणारी शिक्षक लोकशाही आघाडी अर्थातच टीडीएफ पुन्हा एकदा किशोर दराडे यांच्या विजयाने यश मिळविण्यात यशस्वी झाली आहे; मात्र याच निवडणुकीत टीडीएफच्या गटातटात विभागल्या गेलेल्या नेत्यांनी पाठिंबा दिलेल्या अन्य तिघा उमेदवारांनाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघावर आजवर आपले प्रभुत्व कायम ठेवणारी शिक्षक लोकशाही आघाडी अर्थातच टीडीएफ पुन्हा एकदा किशोर दराडे यांच्या विजयाने यश मिळविण्यात यशस्वी झाली आहे; मात्र याच निवडणुकीत टीडीएफच्या गटातटात विभागल्या गेलेल्या नेत्यांनी पाठिंबा दिलेल्या अन्य तिघा उमेदवारांनाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे दराडे यांचा विजय निर्विवाद असला तरी, अन्य उमेदवारांच्या पराभवाचे विश्लेषण करताना टीडीएफच्या नेत्यांबरोबरच शिक्षकांनादेखील आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.  हरिभाऊ शिंदे, टी. एफ. पवार, जयंंतराव ठाकरे, नानासाहेब बोरस्ते, दिलीप सोनवणे यांना विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व म्हणून पाठविणाऱ्या शिक्षक लोकशाही आघाडीला गेल्या दशकापासून दृष्ट लागली असून, शिक्षकांचे नेतृत्व करणाºया नेत्यांच्याच राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून येऊ लागल्याने अन्य संघटनांचे जे काही होते, त्यापासून शिक्षक लोकशाही आघाडी स्वत:ला बाजूला करू शकली नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीत शिक्षक लोकशाही आघाडीच्या नेत्यांमधील मत व मनभेदाचा फायदा घेत अपूर्व हिरे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी केली. त्यांच्या या उमेदवारीला शिक्षक लोकशाही आघाडीच्या एका गटाने विरोधही दर्शविला होता; परंतु राजकीय घराण्याचे वारस सांगणाºया हिरे यांनी राजकीय निवडणुकीत वापरल्या जाणाºया साºया क्लृप्त्यांचा वापर करून गेली निवडणूक लीलया खिशात घातली होती; परंतु त्या निवडणुकीत शिक्षकांना लागलेल्या ‘सवयी’ मोडून काढण्यात शिक्षक लोकशाही आघाडीच्या नेत्यांना यश मिळाले नाही हे कालच्या निवडणूक निकालावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीच्या निकालाने ज्याप्रमाणे शिक्षक लोकशाही आघाडीला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले, त्याचप्रमाणे निवडणूक रिंगणातील राजकीय पक्ष व उमेदवारांच्याही डोळ्यात अंजन घातले गेले आहे. मुळात टीडीएफच्या पाठिंब्यावर उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या किशोर दराडे यांना शिवसेनेने पुरस्कृत करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला, स्वत: दराडे हेदेखील सेनेकडून फारसे इच्छुक नसल्याची चर्चा निवडणुकीच्या काळात झडली होती; परंतु महिनाभरापूर्वीच सेनेच्या उमेदवारीमुळे किशोर दराडे यांचे बंधू विधान परिषदेत निवडून आल्यामुळे सेनेची नाराजी ओढवून घेणे दराडे यांना परवडणारी नव्हती.शिक्षक लोकशाही आघाडीबरोबरच राष्टÑवादी, कॉँग्रेसने पाठिंबा दिलेले संदीप बेडसे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी ज्या पद्धतीने लढत दिली ते पाहता, त्यांच्या पाठीशी राष्टÑवादी व कॉँग्रेस होती की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती दिसून आली. तर टीडीएफचे भाऊसाहेब कचरे, शालिग्राम भिरूड या विशिष्ट गटाच्या बळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्यांनाही शिक्षकांनी पूर्ण साथ दिली नाही, उलट त्यांची उमेदवारी शिक्षक लोकशाही आघाडीच्या अन्य उमेदवारांची मते खाण्यास कारणीभूत ठरल्याचेही निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. एकूणच या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाल्यास टीडीएफ जिंकली, टीडीएफ हारली असेच म्हणावे लागेल.टीडीएफच्या तिसºया फळीतील स्थानिक नेत्यांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या किशोर दराडे यांनी ज्या पद्धतीने नाशिक विभागातील व विशेष करून टीडीएफच्या बालेकिल्ल्यातून मतांची बेगमी आपल्याकडे खेचून आणली ती पाहता खरी टीडीएफ नेमकी कोणती? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.च्सेनेला रोखण्यासाठी प्रयत्न करणाºया भाजपालादेखील या निवडणुकीच्या निमित्ताने हिसका बसला आहे. अनिकेत पाटील या आयात उमेदवाराच्या बळावर निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपाला बंडखोरीचा सामना करण्याबरोबरच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.

टॅग्स :Electionनिवडणूक