शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या जमिनींवरही करआकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:21 IST

नाशिककरांना यापुढे सुविधा पाहिजे असतील तर करसंकट झेलावे लागणार आहे. शहरात नव्याने आढळून आलेल्या सुमारे ५९ हजार मिळकती तसेच नव्याने बांधकाम होणाऱ्या मिळकतींसाठी महापालिकेने करयोग्य मूल्य आकारणीत पाच ते सहा पटीने वाढ केली असून, यापुढे बांधीव इमारतींबरोबरच आजूबाजूच्या मोकळ्या जमिनींवरही सदर मिळकतधारकांना घरपट्टी आकारली जाणार आहे. १ एप्रिल २०१८ पासून सदर करवाढ लागू करण्यात आली आहे.

नाशिक : नाशिककरांना यापुढे सुविधा पाहिजे असतील तर करसंकट झेलावे लागणार आहे. शहरात नव्याने आढळून आलेल्या सुमारे ५९ हजार मिळकती तसेच नव्याने बांधकाम होणाऱ्या मिळकतींसाठी महापालिकेने करयोग्य मूल्य आकारणीत पाच ते सहा पटीने वाढ केली असून, यापुढे बांधीव इमारतींबरोबरच आजूबाजूच्या मोकळ्या जमिनींवरही सदर मिळकतधारकांना घरपट्टी आकारली जाणार आहे. १ एप्रिल २०१८ पासून सदर करवाढ लागू करण्यात आली आहे.  महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कररचनेत सुधारणा करण्याचा धडाका लावला आहे. यापूर्वी आयुक्तांनी स्थायी समितीने सुचविलेल्या घरपट्टी दरात सुधारणा करत ३३ ते ८२ टक्के करवाढीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. परंतु, नागरिकांचा रोष पाहून सत्ताधारी भाजपाने त्यात कपात करत तो १८ टक्क्यावर आणला. आयुक्तांचा प्रस्ताव महासभेने धुडकावून लावल्यानंतर आयुक्तांनी आपल्या अधिकारात आता शहरातील नवीन मिळकतींसाठी करयोग्य मूल्य आकारणीत सुमारे ५ ते ६ पटीने वाढ करत नाशिककरांना दणका दिला आहे. महापालिकेने केलेल्या मिळकत सर्वेक्षणात ५९ हजार ८६ मिळकती नव्याने आढळून आल्या आहेत. या सर्व मिळकतींना आता नवीन करयोग्य मूल्य आकारणी केली जाणार आहे. यापुढे ज्या जुन्या इमारती पाडून नव्याने उभारल्या जातील, त्यांनाही सुधारित करयोग्य मूल्य आकारणी केली जाणार आहे.  विशेष म्हणजे, बांधीव इमारतींबरोबरच आता मोकळ्या जमिनींवरही कर आकारणी केली जाणार आहे. या करयोग्य मूल्यात तब्बल तेरा पटीने वाढ करण्यात आली आहे. शहरात सद्यस्थितीत ४ लाख १२ हजार मिळकती आहेत. त्यातील १७ हजार मोकळ्या भूखंडांवर कर आकारणी केली जाते. परंतु, ज्या मोकळ्या जमिनींवर अद्याप कर आकारणी झालेली नाही,  त्यांना या नव्या कररचनेनुसार मिळकत कर भरावा लागणार आहे. यापूर्वीचा बेसरेट आणि आताचा सुधारित बेसरेट यामध्ये मोठा फरक असल्याने नाशिककरांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. गावठाण भागातील मिळकतींसाठी पाच ते सहा पट वाढ करण्यात आली आहे. प्रामुख्याने जुने नाशिकसह पंचवटी भागात मोठ्या प्रमाणावर जुने पडके वाडे आहेत. ते पाडून नव्या इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, आता नव्याने उभ्या राहणाºया इमारतींना जबर करवाढ केली आहे. याशिवाय तळघर, पोहण्याचे तलाव, क्लब हाऊस, जिम, वॉचमन केबिन, पार्किंगकरिता उभारणी केलेल्या मिळकती, पेट्रोलपंप, सर्व्हिस स्टेशन, हॉटेल, हॉस्पिटल, नर्सिंग होम, अनिवासी वापरातील खासगी खुल्या जागा, मोबाइल टॉवर, सिनेमागृह, वापरात बदल झालेल्या मिळकती, शैक्षणिक संस्था व वसतिगृह वापरातील मिळकती, विनापरवाना बांधकाम केलेल्या मिळकती यांच्याबाबतीतही करयोग्य मूल्य निश्चित करण्यात आले असून त्यातही करवाढ झालेली आहे.५०० चौ. फुटाला अशी होणार आकारणीशहरातील सर्वसाधारणपणे ५०० चौ. फुटाचा विचार केला तर पुढीलप्रमाणे कर आकारणी होणार आहे. निवासी ५०० चौ. फूट जागेसाठी यापूर्वी १६४७ रुपये घरपट्टी वसूल व्हायची. आता ती नवीन दराने ६५८६ रुपये वसूल केली जाणार आहे. अनिवासी इमारतींसाठी यापूर्वी ३९५२ रुपये घरपट्टी आकारली जात होती, परंतु आता तब्बल २३ हजार ७१६ रुपये मोजावे लागणार आहेत. मोकळ्या जमिनींसाठी यापुर्वी ३ पैसे दराने ९८.८२ रुपये आकारणी होत होती ती आता १३७६ रुपये होणार आहे.मग गोदापात्रावरही करआकारणी ?महापालिकेने शहरातील इमारती व सर्व प्रकारच्या जमिनींवर कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी करयोग्य मूल्यात वाढ केलेली आहे. महापालिकेने गोदापात्रातील गांधी तलाव, रामकुंडापासून ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या पात्रात कॉँक्रिटीकरण केले आहे. आरसीसी बांधकामाच्या नियमानुसार महापालिका मग गोदापात्रावरही कर आकारणी करणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय, करयोग्य मूल्य दर ठरविण्याचे अधिकार आयुक्तांना असले तरी त्यात वाढ करण्याचे अधिकार स्थायी समितीला असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे सत्ताधाºयांसह विरोधकांकडून या करवाढीला जोरदार विरोध होण्याचे संकेत मिळत आहेत.शेतजमिनीवरही करआकारणीमहापालिकेमार्फत सर्व प्रकारच्या जमिनींवर कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतजमिनींवरही करयोग्य मूल्य लावले जाऊन त्यानुसार कर आकारणी केली जाणार असल्याचे समजते. परिणामी, शेतकºयांना शेतसारा भरण्याबरोबरच आता महापालिकेचाही कर मोजावा लागणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका