ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांची उन्हाळ कांद्याची रोपे जास्त पाण्यामुळे वाया गेली. तर काही ठिकाणी बियाणे कमी प्रमाणात उगवले. आता कांद्याचे जे पीक आहे त्याचे धुके व दवबिंदूंमुळे नुकसान होत आहे. यंदा कांद्याचे खूप महागडे बियाणे घ्यावे लागले .आता जेमतेम हाती आलेली रोपे वाचविण्यासाठी महागड्या औषधांच्या व्यतिरीक्त फवारणी खर्चाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, कळवण तालुक्यात नगदी पिक म्हणून उन्हाळ कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे सध्या शेत शिवारात लागवडीची लगबग जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अभोणा परिसरात कांदा पिकावर करपा, मर रोगाचा प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:20 IST