लासलगाव : कांद्याचे भाव वाढले की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत गृहिणींचे बजेट बिघडते; मात्र लासलगाव बाजार समितीत कांदा व्यापारी कांदा खरेदीत गुंतलेला असताना मोकाट गुरांनी व्यापाºयाने खरेदी केलेल्या कांद्यावर यथेच्छ ताव मारला. यावेळी जवळच असलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांनी बघ्याची भूमिका घेतल्याने व्यापाºयाचे पाच ते सहा हजार रु पयांचे नुकसान झाले.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावाने चांगली उसळी घेतली असून, आज जास्तीत जास्त २४००, सरासरी २१६० रुपये तर कमीत कमी ८०० रु पये प्रति क्विंटलने कांदा व्यापारी लिलावात खरेदी करत होते. एका व्यापाºयाने खरेदी केलेला कांदा गोण्यांत भरून ठेवला होता. त्या कांद्यावर अचानक आलेल्या मोकाट गुरांच्या कळपाने ताव मारला. यावेळी जवळच असलेले शेतकºयांनी तो कांदा आपला नसून व्यापाºयाचा असल्याने बघ्याची भूमिका घेतली. अंदाजे २ ते ३ क्विंटल कांदा गुरांनी फस्त केला.
कांद्यावर मोकाट गुरांचा ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:57 IST