शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्रिसूत्री’द्वारे शेतकºयांना सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:27 IST

राज्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालालाच ई-मार्केट संकल्पनेत आणून राज्यभर ५२ शीतगृहांची शृंखला निर्माण करण्यात येत असून, वीज, पाणी व बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकºयांना सक्षम करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

लासलगाव : राज्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालालाच ई-मार्केट संकल्पनेत आणून राज्यभर ५२ शीतगृहांची शृंखला निर्माण करण्यात येत असून, वीज, पाणी व बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकºयांना सक्षम करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, नार-पार खोºयातून गिरणा खोºयात १० टीएमसीपेक्षा अधिक पाणी आणण्यात येणार असून, पार खोºयातून गोदावरी खोºयात आणल्या जाणाºया पाण्यापैकी ३ टीएमसी पाणी पालखेड समूहात येणार असल्याने त्याचा लाभ चांदवड, येवला व सिन्नरला होणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. लासलगाव येथील रेल्वेस्थानक परिसरात खरेदी-विक्री संघाच्या प्रांगणात रविवारी दुपारी दोन वाजता पाच कोटी रुपये खर्चाच्या देशातील पहिल्या बहुद्देशीय कांदा शीतगृहाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल, सौ. प्रभू, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार स्नेहलता कोल्हे, सीमा हिरे, कंटेनर्स कॉर्पोरेशन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष व्ही. कल्याण रामा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. के. यादव उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यभर रेल्वेचे चांगले जाळे निर्माण झाले तर शेतमालाची ने-आण करण्यासाठी त्याचा फायदा शेतकºयांना होईल. रेल्वेमार्ग होण्यासाठी पन्नास टक्के खर्चही शासन करीत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. देशात उभारण्यात येणाºया २२७ पैकी ५२ शीतगृहे महाराष्टÑात उभारली जात आहेत. त्यापैकी २५ आता पूर्ण होतील व उर्वरितही लवकरच पूर्ण करण्यात येतील असे सांगून फडणवीस यांनी शीतगृहांसाठी वीजदर कमी करण्याचेदेखील शासनाच्या विचाराधिन असल्याचे सांगितले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी यावेळी कामायनी एक्स्प्रेसला लासलगाव येथे जाताना व येतानाचा थांबा देण्याची घोषणा केली. व्ही. कल्याण रामा यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह रेल्वेमंत्री प्रभू तसेच उपस्थित मंत्री महोदयांचा गांधी टोपी व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकपर भाषणात लासलगाव खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी लासलगाव विभाग खरेदी विक्र ी संघाच्या सामंजस्य करारानुसार रेल्वेच्या कंटेनर्स कार्पोरेशन ट्रान्सपोर्ट यांच्या तर्फे देशात प्रथमच २५०० मेट्रीक टन क्षमतेचे हे बहुद्देशीय शीतगृह बांधण्यात येणार असुन खरेदी-विक्र ी संघाने यासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे . या शीतगृहात १२५० मेट्रिक टन जागा कांदा या पिकाकरीता राखीव ठेवण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. सुत्रसंचलन प्रा. भास्कर ढोके यांनी तर आभार यादव यांनी मानले.टोमॅटो केचअप प्रक्रिया उद्योगासाठी जपानसोबत करारगेल्या दोन वर्षांत शेतमालाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. ग्रेप नेटच्या माध्यमातून ३० हजार द्राक्षबागांची नोंदणी झाली असून, द्राक्ष निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. अनार नेट आणि मॅँगो नेटच्या माध्यमातून डाळींब आणि आंब्याच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. टोमॅटो केचअप प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जपानी कंपनीसोबत करार करण्यात आला असून, त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनाला हमीभाव मिळून दराच्या चढ-उताराचा त्यावर परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.शीतगृहाचे काम वर्षभरात पूर्ण होणार : सुरेश प्रभूरेल्वे खाते व कृषी विभाग यांचा फारसा संबंध आलेला नसला तरी शेतकºयांच्या उत्पादित मालाची साठवणूक झाली तर त्याचा त्यांना थेट फायदा होईल. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दि. ३ जून रोजी विचार मांडताच रेल्वेमंत्री म्हणून आपण लगेचच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून लासलगाव येथे पाच कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले शीतगृह उभारण्याचा निर्णय घेतला. हे काम वर्षभरात पूर्णत्वास जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.शेतकºयांची घोषणाबाजीमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाप्रसंगी येवला येथील संतूपाटील झांबरे यांच्यासह चार-पाच शेतकºयांनी कृषी कर्जमाफीबद्दल घोषणाबाजी केल्यामुळे सभेत पाच-दहा मिनिटे गोंधळ उडाला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून जोरदार टोलेबाजी करीत मीडियाचे लक्ष जावे व आपली छबी वाहिन्यांवर झळकावी यासाठी हा प्रकार केला जात आहे. ही स्टंटबाजी आहे. अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे व टाळ्या वाजवून या अपप्रवृत्तीला विरोध करा, असे सांगताच उपस्थितांनी साथ दिली.नैताळेत गांधीगिरीनैताळे येथील शेतकºयांनी सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेचा गांधीगिरीने अनोखा निषेध केला. त्यासाठी निमित्त शोधले मुख्यमंत्र्यांच्या लासलगाव येथील दौºयाचे. नैताळेच्या शेतकºयांनी व व्यावसायिकांनी नैताळे गाव बंद ठेवून चुकीच्या कर्जमाफीचा निषेध नोंदविला; शिवाय मुख्यमंत्री नैताळे येथून गेल्यानंतर नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शेतकºयांनी पंचामृत व दूध शिंपडले आणि पाण्याने हा रस्ता धुऊन गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला.