शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

नाशिक जिल्ह्यात टॅँकरने अडीचशेचा टप्पा ओलांडला

By श्याम बागुल | Updated: May 2, 2019 15:05 IST

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.

ठळक मुद्दे९०१ गावे, वाड्यांना टंचाई : १०१ विहीरी अधिग्रहीत

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दररोज झळ बसत असून, त्यासाठी २५६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. साधारणत: आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. परंतु जलयुक्त शिवार योजनेचा जिल्ह्यात ढिंडोरा पिटला जात असताना टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास प्रशासनाचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे प्रशासनाने ग्रामीण भागात टॅँकर सुरू करण्यास चालढकल चालविली होती. अखेर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा दबावामुळे प्रशासनाने फेब्रुवारीत टॅँकर सुरू केले. मार्च महिन्यापासून दर आठवड्याला टॅँकरची संख्या वाढू लागली असून, एप्रिल अखेरपर्यंत ही संख्या २५६ पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर व येवला या आठ तालुक्यातील २०७ गावे व ६९४ वाड्या अशा ९०१ गावांतील सुमारे पाच लाख लोकवस्तीला पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. टॅँकरबरोबरच १०१ खासगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या विहीरीतून गावासाठी पिण्याच्या पाण्याची तसेच काही गावांसाठी टॅँकर भरण्याच्या कामी या विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय