शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कमी पाऊस पडूनही जिल्ह्यातील टॅँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:28 IST

पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत शासनाने मुदत दिली असल्याने जिल्ह्यातील २६९ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर रविवारपासून बंद करण्यात आले असून, ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

नाशिक : पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत शासनाने मुदत दिली असल्याने जिल्ह्यातील २६९ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर रविवारपासून बंद करण्यात आले असून, ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टॅँकर  मंजुरीचे अधिकार शासनाला असल्यामुळे ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल त्यासाठी मुदतवाढीचे नवीन प्रस्ताव तहसीलदारांना सादर करावे लागणार आहेत.नाशिक जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा मुद्दा पुढे करून मार्च महिन्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली होती. त्यातही काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी दबाव टाकल्यामुळे टॅँकर सुरू होऊ शकले होते. एप्रिल व मे महिन्यात  जिल्ह्णात उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे टंचाईत वाढ होऊन गावोगावी टॅँकरची मागणी वाढली होती.  साधारणत: जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन नद्या, नाल्यांना पाणी येते तसेच विहिरींचे स्रोत प्रवाहित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटत असल्याची शासनाची  भावना आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले असून, जून महिन्याचा पाऊस लांबणीवर पडला आहे. मात्र सरकारचे नियम, निकष बदलायला तयार नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टॅँकर बंद झाल्याने पुन्हा एकदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव सिन्नर तहसील कार्यालयाने पाठविला आहे.२६९ गावांचा समावेशच्जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ११९ गावे, २२२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु शेवटच्या आठवड्यात मान्सूनने चांगली हजेरी लावल्यामुळे २२ टॅँकरची संख्या कमी झाली होती. असे असले तरी, शासनाने टंचाई कृती आराखड्यानुसार ३० जूनपर्यंतच टंचाईग्रस्त गावांना टॅँकर सुरू करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे रविवारी जिल्ह्यातील सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा या सहा तालुक्यातील २६९ गावांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर बंद करून टाकले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई