शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजुरीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 02:01 IST

पिण्याचे पाणीटंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजूर करण्याचे तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणीपुरवठा करणे शक्य आहे का? याबाबत तपासणी करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.

नाशिक : पिण्याचे पाणीटंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजूर करण्याचे तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणीपुरवठा करणे शक्य आहे का? याबाबत तपासणी करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.शासनाने दि. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी शासन निर्णय काढून दुष्काळ जाहीर केला आहे. अशा जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर करण्याचे संबंधित उपविभागीय अधिकारी यांना आदेश दिले आहेत. मात्र टँकर मंजूर करणे अतिशय खर्चिक उपाययोजना असल्याने ही उपाययोजना अपरिहार्य परिस्थितीतच कमीत कमी खर्चाची उपाययोजना म्हणून मंजूर करणे आवश्यक आहे.याबाबत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप सचिवानी सर्व जिल्ह्यांना लेखी सूचना दिल्या आहेत.  यामध्ये टँकर मंजूर करण्यापूर्वी विहीर, विंधन विहीर अधिग्रहण, तात्पुरती पाणीपुरवठा योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, बंद असलेल्या प्रादेशिक योजना कार्यान्वित करणे याबाबत तपासणी करून पाणीपुरवठा करणे शक्य आहे का याबाबत पडताळणी करणे आवश्यक असल्याचे तसेच ज्या ठिकाणी टंचाई अंतर्गत घेण्यात येणाºया आकस्मिक उपाययोजना घेऊनही पाणी उपलब्ध होत नसल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे करण्याचे सूचित करण्यात आले. आहे.पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करताना पशुधनासाठी लागणाºया पाण्याची गरज विचारात घेऊन उपाययोजना राबविण्याचे तसेच टँकर मंजूर करताना उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई