शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर येथील टँकरच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:23 IST

येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र गेल्या आठ दिवसांपासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमहिला आक्रमक : आठ दिवसांपासून नागरिकांचे हाल

ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र गेल्या आठ दिवसांपासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने पावसाळ्यातदेखील परिसरातील छोटे-मोठे बंधारे कोरडे होते तसेच विहिरींना पाणीच आले नाही. त्यामुळे परिसरातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, सोमठाण जोश, कोळगाव, रेंडाळा आदी गावांना मागील बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.गावातील टँकर दररोज येतो मग वाडी वस्तीवरील का येत नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी व बोअरवेल दोन्हीही कोरडेठाक असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. या परिसरातील शेतकरी हे आपल्या शेतातच राहतात. दरवर्षी शेतकºयांना पिण्यासाठी पुरेल एवढे पाणी विहिरींना असायचे किंवा बोअरवेलला तरी पाणी शेतकºयांच्या कुटुंबाला व जनावरांना पिण्यासाठी असायचे; परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्यासाठी पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे हाल होत आहे. त्यामुळे शासनाने गावाबरोबरच वाडी-वस्तीवरील शेतकºयांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.टँकरचालकाची अरेरावीटँकरचालक शेतकरी, महिला यांच्यावर अरेरावीची भाषा वापरून पाणी वाटप करताना प्रत्येकाशी हुज्जत घालतो अशी ओरड आहे. त्यामुळे सदर टँकर बदलून मिळावा अशी मागणी होत आहे. गावची लोकसंख्या विचारात घेता एका टँकरचे पाणी अपूर्ण पडत असल्याने वाडी-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई