शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आडगावमध्ये टांगा शर्यत भोवली; संयोजकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 14:14 IST

प्राण्यांना शर्यतीसाठी जुंपत त्यांच्या शरीरावर चाबकाचे आसूड ओढत छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.

ठळक मुद्दे प्राण्यांच्या शरीरावर चाबकाचे आसूड चौकात राहत्या घरात तरुणीची आत्महत्त्या

नाशिक : प्राण्यांच्या टांगा शर्यतीवर बंदी असतानाही आडगाव शिवारात बैल व घोड्याला टांग्याला जुंपून त्यांची शर्यत लावल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आडगाव शिवारातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लागून असलेल्या भुखंडावर टांगा शर्यत भरविणारे पंच व संयोजक सागर माळोदेविरुध्द यशवंत मोहन गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांना शर्यतीसाठी जुंपत त्यांच्या शरीरावर चाबकाचे आसूड ओढत छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.---अंबडच्या कारगील चौकात राहत्या घरात तरुणीची आत्महत्त्यानाशिक : अंबड परिसरातील कारगील चौकामध्ये राहणा-या जयश्री रुपसिंग ठाकरे (२६) या युवतीने राहत्या घरात पंख्याच्या आधारे ओढणीने गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास जयश्रीने गळफास घेतल्याचे पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यूच्या नोंदीत म्हटले आहे. आत्महत्त्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

--शस्त्रबंदी आदेश : कोयता घेऊन कॉलेजरोडवर फिरणारे तीघे ताब्यात

नाशिक : शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करीत कॉलेजरोड परिसरात धारधार कोयता घेऊन वावरणा-या तीघांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. संशयित किरण दत्तात्रय चव्हाण(१९) व त्याचे तीन साथीदार कोयता घेऊन कॉलेजरोड परिसरातील एका हॉटेलमागे फिरत होते. दरम्यान, पोलिसांना सदर बाब लक्षात येताच्या त्यांनी कोयता जप्त करत तीघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्पच्या राईसमिल मधून ८० हजार लंपासनाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील भगूर रस्त्यावर असलेल्या सप्तश्रृंगी राईस मिलचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत ८० हजार रुपयांची रोकड लंपा केल्याची घटना उघडकीस आली आहे.दुकानमालक देवेंद्र प्रकाश पवार (४०) यांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुध्द देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दुकान फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा