शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुल धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:07 IST

गेल्या २०१३-१४ मध्ये सुमारे एक कोटी रुपये खर्चून उभारलेले नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुल अक्षरश: धूळ खात पडले आहे. काटेरी झुडपांनी वेढलेले आणि तळीरामांचा अड्डा बनलेल्या या संकुलाची बुधवारी (दि. १८) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.

ठळक मुद्देसटाणा : सक्षम संस्थेकडे हस्तांतरित करून तत्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना

सटाणा : गेल्या २०१३-१४ मध्ये सुमारे एक कोटी रुपये खर्चून उभारलेले नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुल अक्षरश: धूळ खात पडले आहे. काटेरी झुडपांनी वेढलेले आणि तळीरामांचा अड्डा बनलेल्या या संकुलाची बुधवारी (दि. १८) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.क्र ीडा संकुलाची तत्काळ दुरु स्ती करून देखभालीसाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सक्षम संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना आमदारांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील नामपूर गावालगत असलेले क्रीडा संकुलाची अवस्था उद्घाटनाआधीच अक्षरश: कचराकुंडीसारखी झाली आहे. याबाबत आमदार बोरसे, तहसीलदार इंगळे-पाटील यांनी दुपारी बुधवारी क्रीडा संकुलाची पाहणी केली. संपूर्ण क्रीडा संकुलच काटेरी झुडपांनी वेढलेले आढळून तसेच शौचालयांची तोडफोड, दारूच्या रिकाम्या बाटल्या, तुटलेले प्रवेशद्वार अशा अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. ही संकुलाची दुरवस्था पाहून आमदार बोरसे यांनी तत्काळ तालुका क्रीडा अधिकारी महेश ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रवींद्र रौंदळ, गटविकास अधिकाऱ्यांना बोलावून यावेळी या सर्व गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, आमदार बोरसे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात नामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पवार, हिरे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या प्रमुख डॉ. सुरेखा दप्तरे, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. योगेश पगार, डॉ. नितीन कोर, प्रा. जी. के. कापडणीस, अण्णासाहेब सावंत, अशोक सावंत, कविता सावंत, पूनम कोकणे, जयश्री सावंत, करुणा अलई, बाळासाहेब भदाणे तसेच अधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन क्रीडा संकुलाची उर्वरित कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.क्र ीडा संकुल कार्यान्वित करा...आमदार बोरसे यांनी क्र ीडा संकुलाच्या संरक्षक भिंत बांधकामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगून क्र ीडा संकुलाची उर्वरित कामे पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी क्र ीडा साहित्य उपलब्ध करून खेळाडूंसाठी खुले करण्याच्या सूचना दिल्या. क्र ीडा संकुलाची देखभाल होऊन चांगले खेळाडू कसे तयार होतील यासाठी नामपूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि डॉक्टर असोसिएशनने समन्वय साधून निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.क्र ीडा अधिकारी कार्यालयांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात क्र ीडा संकुलांची दुरवस्था झाली आहे. नामपूर येथील क्र ीडा संकुलाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी हस्तांतरण प्रक्रि या अद्याप झालेली नाही. मानधन तत्त्वावार क्रीडा मार्गदर्शक, शिपाई यांची नेमणूक केली जाईल. जवळच असलेल्या नामपूर महाविद्यालयाने क्रीडा संकुलाचे पालकत्व घ्यावे.- जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदारआजची तरु ण पिढी सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे खेळापासून दूर जात आहे. त्यामुळे क्रीडा संकुल ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी वरदान आहे. येथील भग्नावस्थेत असलेल्या क्र ीडा संकुलामुळे मन विषण्ण होते. तालुकास्तरीय शालेय व महाविद्यालयीन क्र ीडा स्पर्धा संकुलात घेतल्या जाव्यात. क्र ीडा अधिकाºयांनी तातडीने क्र ीडा संकुल सुरू करावे.- नारायण सावंत,सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :MLAआमदार