शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक खरेदीसाठी तालुकास्तरीय चौकशी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 20:18 IST

नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येकी २२ हजार रुपये किमतीचे १२२ बायोमेट्रिक यंत्र खरेदी करून ते प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये बसविले होते. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला वळण व शिस्त लावण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कर्तव्यावर हजर राहावे

ठळक मुद्देपंधरा दिवसांत अहवाल : जिल्हा परिषद प्रशासनाचा निर्णयआरोग्य विभागाचा कोट्यवधी रुपये खर्च वाया गेल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्याआरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या, परंतु वापराविना पडून असलेल्या बायोमेट्रिक यंत्राची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी घेतला आहे. त्यासाठी तालुका पातळीवरच त्रिसदस्यीय समिती ही चौकशी करणार असून, पंधरा दिवसांत समितीने अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येकी २२ हजार रुपये किमतीचे १२२ बायोमेट्रिक यंत्र खरेदी करून ते प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये बसविले होते. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला वळण व शिस्त लावण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कर्तव्यावर हजर राहावे हा त्यामागचा हेतू होता. मात्र काही दिवसांतच सदरचे बायोमेट्रिक यंत्रे बंद पडली. सदरची यंत्रे तालुका पातळीवरच तालुका वैद्यकीय अधिका-यांनी परस्पर कंपन्यांकडून खरेदी करून ते बसविले असले तरी, अशी यंत्रे खरेदी करताना संबंधित कंपन्यांशी दुरुस्तीचा करारही करण्यात आला होता. असे असताना सदरची यंत्रे गेल्या काही वर्षांपासून बंद पडली असून, आरोग्य विभागाचा कोट्यवधी रुपये खर्च वाया गेल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी करून या यंत्र खरेदीची व नादुरुस्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही हा विषय पुन्हा छेडला गेला. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बायोमेट्रिक यंत्र खरेदीबाबत चौकशी समिती नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही यंत्रे बसविण्यात आली असल्याने जिल्हास्तरीय अधिकाºयांकडून प्रत्येक आरोग्य केंद्रात जाऊन त्याची तपासणी व चौकशी करणे शक्य नसल्याचे पाहून तालुका पातळीवरील अधिकाºयांकडून ही चौकशी करण्याचे ठरविण्यात आले. या समितीत गटविकास अधिकारी, सहायक लेखाधिकारी व ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी अशा तिघांचा समावेश आहे. या समितीने आपापल्या तालुक्याचा चौकशी अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य