शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी परीक्षेचे सर्व्हर डाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:11 IST

महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.

नाशिक : महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.महापरीक्षेंतर्गत शहरात गेल्या २ तारखेपासून तलाठी पदासाठीची परीक्षा सुरू आहे. मात्र या परीक्षेसंदर्भातील अनेक अडचणी अजूनही समोर येत असून, मंगळवारी शहरातील व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निकल इन्सिट्यूट या परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. शहरातील विविध सहा केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जात असून, सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत परीक्षा घेतली जात आहे. सकाळी १० वाजता सकाळचे सत्र तर दुपारी २ वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार सकाळी १० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आले होते. नियमानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे कागदपत्रे तपासली जात असतानाच सर्व्हर डाउन असल्याचे परीक्षा केंद्रप्रमुखाच्या लक्षात आले. त्यांनी वारंवार प्रयत्न केला तसेच शासनाच्या परीक्षा नियंत्रकांनादेखील याबाबतची माहिती दिली. परंतु परीक्षेच्या निर्धारित वेळेत म्हणजे दहा वाजेपर्यंत सर्व्हर सुरू होऊ न शकल्याने अखेर परीक्षा रद्द करावी लागली.या परीक्षेसाठी उमेदवाराने ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्राच्या आवारात असावे, असा परीक्षेचा निमय आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक निर्धारित वेळेत केंद्रावर हजर होते. परंतु व्ही. एन. नाईक याा केंद्रातील सर्व्हर डाउन झाल्यानंतर कोणताही कमांड घेत नसल्याने महापरीक्षेला सदर बाब कळविण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या बॅचची परीक्षा रद्द झाली, मात्र दुपार सत्रातील परीक्षा मात्र सुरळीत पार पडली.अडचणी कायम उमेदवारांच्या तक्रारीतलाठी परीक्षा गेल्या २ तारखेपासून सुरू असून परीक्षेतील अडचणींच्या अनेक कथा ऐकायला मिळत आहे. अनेक केंद्रांवर मुलांना अडचणी येत असताना विद्यार्थ्यांचे मात्र समाधान होऊ शकलेले नसताना पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. यापूर्वी अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या अडचणी आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने परीक्षेचा कालावधी वाढला असून, एका केंद्रावर दररोज किमान १५० ते २०० विद्यार्थ्यांची परीक्षा देत आहेत.

टॅग्स :onlineऑनलाइनGovernmentसरकार