शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लागला टकळा पंढरीचा.. पंढरीच्या वाटे वारकरी हुरूहुरू पाहे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 18:06 IST

लखमापूर : कोरोनामुळे पंढरपूरची वारी रद्द झाल्याने दिंडोरी तालुक्यातील पायी वारी करणारे वारकरी वर्गाच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आहेत. यंदा पांडुरंगाचे दर्शन होणार नसल्याने वारकऱ्यांचा जीव कसावीस होत आहे. वारकरीवर्गाचे मन पंढरपुरात लागून राहिले आहे. वारकरी शरीराने आपापल्या गावी असले तरी त्यांच्या मनात दिंडीची हुरहुर सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील वारकरी वर्गाच्या डोळ्यांतून ढळू लागले अश्रू

लखमापूर : कोरोनामुळे पंढरपूरची वारी रद्द झाल्याने दिंडोरी तालुक्यातील पायी वारी करणारे वारकरी वर्गाच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आहेत. यंदा पांडुरंगाचे दर्शन होणार नसल्याने वारकऱ्यांचा जीव कसावीस होत आहे. वारकरीवर्गाचे मन पंढरपुरात लागून राहिले आहे. वारकरी शरीराने आपापल्या गावी असले तरी त्यांच्या मनात दिंडीची हुरहुर सुरू झाली आहे. वारकरी वर्गाची पावले मनाने पंढरीच्या वाटेवर चालू लागली आहे. ‘लागला टकळा पंढरीचा’ अशी अवस्था वारकरी वर्गाची झाली आहे. वारीच्या वाटेवर आलेला अनुभव काही वारकरी आता आपल्या गावातील पारावर बसून, डोळ्यातील अश्रु पुसत एकमेकांना सांगत आहेत.आजच्या तिथीनुसार दिंडी कुठे मुक्कामी राहाते. तेथे कोणाचे कीर्तन राहाते, हे कथन करताना वारकरी वर्गाचे मन भरून येते.टाळी वाजवावी, गुडी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची,अशा गोड अभंगाचा स्वर आता कानावर पडत नसल्यामुळे वारकरी यंदा घरीच थांबल्याने खिन्न मनाने संताचे अभंग म्हणत आहे. त्यामुळे ‘पंढरीची वारी आहे माझे घरी’असे अभिमानाने सांगणाºया वारकरी मंडळींना यंदा मात्र कोरोनाच्या साथीमुळे घरीच थांबावे लागले आहे.वारकरी सांप्रदायाचे विश्वगुरु श्री संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पौर्णिमेच्या दुसºया दिवशी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान होते. आषाढी वारी म्हणजे वारकरी सांप्रदायातील एक महान पर्वणीच मानली जाते. परंतु कोरोनामुळे या पर्वणीला ब्रेक लागला आहे. अजून किती दिवस आमच्या लाडक्या विठुरायाचे मुखदर्शन होणार नाही, असा सवाल वारकरी मंडळींनी विचारला आहे.अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी करणारे काही कीर्तनकारांनी पंढरीची वारी यंदा न घडल्याने खंत व्यक्त केली आहे.प्रतिक्रि या...मी वयाच्या ११व्या वर्षापासून पंढरपूरची वारी करतो. परंतु यंदा कोरोनामुळे वारीची परंपरा खंडित झाली. खूप दु:ख होत आहे.- वाल्मिक महाराज, ब्राह्मणगावकरपंढरीची वारी माझ्या घरी असून आम्ही नित्यनेमाने पंढरपूरची वारी करीत आलो आहे. परंतु यंदा आम्हाला आमच्या सावळ्या पांडुरंगाचे मुख दिसणार नसल्यामुळे मनस्वी खूप दु:ख होत आहे.- रामकृष्ण महाराज पिंपरखेडकरमला समजत नव्हते. तेव्हापासून मी पंढरपूरची वारी करतो. अजूनपर्यंत वारी कधी खंडित झाली नाही. परंतु यंदा शासनाने पंढरीची वारी रद्द केल्याने आमचे कुलदैवत पांडुरंग परमात्म्याचे रूप आम्हाला दिसणार नसल्यामुळे आमची मन:स्थिती खिन्न झाली आहे.- निवृत्तिनाथ महाराज काळे, दिंडीचालक, विजयनगर (फोटो२१वारकरी)(संग्रहीत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य