शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांना राख्या बांधून घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:08 IST

पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाताळेश्वर विद्यालयातील विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रांगणात असलेल्या वृृक्षांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.  विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे करताना आपल्या विद्यालयातील प्रांगणातील प्रत्येक वृक्षास व रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांना राखी बांधून ‘वृक्ष वली आम्हा सोयरे वन चरे’, ‘सदा राखू, वृक्ष लावा वृक्ष जगवा, वृक्ष हीच संपत्ती, एक मूल एक झाड, वृक्ष लावा दारी मिळेल छाया भारी, अशी शपथ घेतली. नारळी पौर्णिमा या सणाचे महत्त्व व रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व सविता देशमुख यांनी सांगितले. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा ºहास होण्याची कारणे सांगून आपण सर्वांनी त्याच्या संवर्धनासाठी धार्मिकतेबरोबर विज्ञानाची जोड देऊन संकल्प केला. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनीने एका मुलास राखी बांधून प्रेम, बंधुता, सर्वधर्मसमभाव, स्व-संरक्षण या गुणाची त्याच्याकडे भेट म्हणून मागणी केली व माझ्या रक्षणासाठी तू माझ्या पाठीशी उभे रहावे ही भावना व्यक्त केली. विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी ओम रेवगडे याचे औक्षण करून त्यास सर्व मुलींनी राख्या बांधल्या.  आजच्या दिवसाचे औचित्य साधून वृक्षाचा वाढदिवस साजरा करून राखी बांधली. बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष गोविंद लोखंडे,  संचालक अरूण गरगटे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन अशोक रेवगडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नवनाथ जाधव,  उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर,  आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, आर. आर. गिते, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे हे उपस्थित होते.

टॅग्स :environmentवातावरणRaksha Bandhanरक्षाबंधन