शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

विद्युत रोहित्र निकामी झाल्याने टाकेहर्ष आठ दिवसांपासून काळोखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:56 IST

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेहर्ष या गावातील विद्युत रोहित्र आठ ते दहा दिवसांपासून निकामी झाल्यामुळे ...

ठळक मुद्देपाणीपुरवठा खंडित; महिला हैराण : भर उन्हाळ्यात बत्तीगुलने नागरिक घामाघूम

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेहर्ष या गावातील विद्युत रोहित्र आठ ते दहा दिवसांपासून निकामी झाल्यामुळे गावात अंधार दाटला असून तब्बल आठ ते दहा दिवसांपासून या गावातील नागरिकांना काळोखात दिवस काढावे लागत आहेत.

याबाबत महावितरण विभागाला कळविले असता अजूनही दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.टाकेहर्ष गावाची अंदाजे ९०० लोकसंख्या असून गावाकरिता महावितरण विभागाकडून ६३ केव्हीचा रोहित्र वापरात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोहित्र निकामी झाल्याने गावामध्ये वीजपुरवठा खंडित आहे.

महावितरण विभागाला याबाबतची माहिती पुरविली असता तीन ते चार दिवसांत नवीन रोहित्र उपलब्ध होईल. परंतु गावातील वीजजोडणी धारकांनी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वीजबिल न भरल्यामुळे गावातील अशा लोकांची पूर्वसूचना देऊन वीज जोडणी काढण्यात आली आहे.दळणाची पंचाईतविजेअभावी नागरिकांची अवस्था बिकट झाली असून ऐन उष्म्याच्या दिवसांत बत्तीगुल झाल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. फ्रीज, पंखा, मोबाईल आदी विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा उपयोग शोभेच्या वस्तू म्हणूनच होत आहे. तर विजेअभावी पिठाची गिरणी बंद असल्याने दळण दळण्याची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठा बंद असून नैसर्गिक स्त्रोताच्या माध्यमातून महिलांना उन्हातान्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.टाकेहर्ष येथील रोहित्र निकामी झाल्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर दिला असून तीन ते चार दिवसांत नवीन रोहित्र बसविण्यात येईल. नागरिकांनी थकीत बिले भरून महावितरण विभागाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.- किशोर सरनाईक, महावितरण अधिकारी, त्र्यंबकेश्वर.नागरिकांना थकलेली वीजबिले भरण्यासंबंधी आवाहन करण्यात येत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे बिले भरण्याची कुवत नागरिकांमध्ये नसल्यामुळे बिले थकीत राहिली आहेत.- धर्मा भस्मे, सरपंच, टाकेहर्ष. 

टॅग्स :electricityवीजSocialसामाजिक