शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पाणीटंचाई रोखण्यासाठी उपाययोजना करा

By admin | Updated: January 21, 2016 22:21 IST

निवेदन : येवला शहर भाजपाची नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

येवला : शहरातील पिण्याच्या पाण्याच्या शुद्धिकरणात होत असलेला गलथानपणा व भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता त्यावरील उपाययोजनांबाबत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. येवला शहराला गेल्या ३० ते ३२ वर्षांपासून शुद्ध व स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा तत्कालीन नगराध्यक्ष कै. केशवराव पटेल यांच्या धोरणामुळे अखंडितपणे सुरू आहे. शहराचा विस्तार लक्षात घेता नगरपरिषदेने नवीन व जास्त क्षमतेची जलशुद्धिकरण यंत्रणा गेल्या काही वर्षांत कार्यान्वित करून शहराला पूर्ण क्षमतेने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरपरिषदेने जलशुद्धी करण्याचे प्रमाण वाढवले पण जलशुद्धिकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी पावडर निकृष्ट दर्जाची असून तिच्या वापराने नागरिकांना पोटदुखी, उलट्या यांसह साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जलशुद्धिकरण प्रक्रि येत टीसीएलपावडर ही ३३ टक्के क्लोरीनयुक्तप्रमाणित पाहिजे व तुरटीही एवन ग्रेडची पाहिजे. मात्र शहरातील जलशुद्धिकरण केंद्रात निकृष्ट दर्जाची पावडर वापरली जात असल्याने जनसामान्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलशुद्धिकरण केंद्राचे क्लोरिंग रूम (युनिट) फक्त दिखाव्यासाठी असून, त्यातील क्लोरिंगच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. या क्लोरिंग सिस्टिमचा वापर कधी होणार, शहरात लाखो रु पये खर्चून पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेली पाइपलाइनही आर्धापर्यंत टाकण्यात आली आहे. परंतु ज्या भागात ती टाकण्यात आली त्या भागाला तिचा काहीच उपयोग नाही. लाखो रु पयांचा चुराडा होऊनही येवलेकरांना कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना अजूनही जंतयुक्त अशुद्ध व गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी वसुलीत व्यस्त असताना, टंचाई काळात तलाव परिसरातील विहिरींमधून दिवस-रात्र पाणीचोरी होऊन या पाण्याची अवैध विक्र ी केली जात आहे. पाणीपट्टी कर नागरिकांनी भरायचा आणि पाणी पळवायचे पाणी चोरांनी, अशी स्थिती शहरात दिसून येत आहे. तलाव परिसरातील सर्वच पाणीचोरांना जरब बसवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.निवेदनावर शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, दुर्गा भांडगे, श्यामसुंदर काबरा, दिनेश परदेशी, भरत क्षीरसागर, गीताराम दारु णकर, मीननाथ पवार, सागर नाईकवाडे, चेतन धसे, अमोल क्षीरसागर, उमेश काकडे, अन्सारी रहीम, सुनील काटवे, संकेत वाडेकर, श्रीराम क्षीरसागर, राजू रंगरेज, चेतन बाकळे, नितीन कायस्थ, कृष्णा गाडेकर, गणेश विघे, संदीप कटारे, सुनील बढे, गणेश कुमावत, वैभव वाडेकर, संजय खानापुरे, सुरेश बोगर, दीपक पोकळे, रु पेश भोसले, मच्छिंद्र पवार, राजू शिंदे, आकाश दाणेज, जगदीश भावसार, सचिन क्षीरसागर, हितेश शिंदे, सुमीत खानापुरे, मयूर मेघराज यांसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)