शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जे आहे ते जपा; 'अंजनेरी' संवर्धनासाठी हेमंत गोडसेंना निसर्गप्रेमींचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:32 IST

जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणारे लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाडांचा हक्काचा अधिवास आहे, यामुळे हे वन कायमस्वरूपी सुरक्षित करण्याची गरज असल्याचे सांगत महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसर्वांनासोबत घेत फेरविचार करण्याचे आश्वासनगिधाडांचा हक्काचा अधिवास आहेशाश्वत विकासाची कास धरावी

नाशिक : अंजनेरीच्‍या पायथ्यापासून माथ्यापर्यंत प्रस्तावित चौदा किमीचा रस्ता तयार करण्याच्या हालचाली सुरु होताच नाशिककरांसह अन्य शहरांमधूनही कडाडून विरोध होऊ लागला आहे. रस्त्याचा प्रस्ताव तात्काळ मागे घेतला जावा, यासाठी पर्यावरणप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांना शुक्रवारी (दि.23) निवेदनांद्वारे साकडे घातलेङ्घअंजनेरीगडाचे क्षेत्र जैवविविधतेने नटलेले समृद्ध संवर्धन राखीव वन म्हणून राज्य सरकारने 2017साली घोषित केले आहे. या वनाचे संवर्धन पर्यटनाला वाव देण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे, यामुळे या वनाला मोठ्या प्रमाणात बाधित करणारा संभाव्य प्रस्तावित रस्ता करण्याचा अट्टाहास सोडावा, अशी मागणी आपलं पर्यावरण संस्था, नेचर कॉन्सझर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक, निसर्गभान संस्था, गोविंदनगर ज्‍येष्‍ठ नागरीक संघ, शरण संस्था, इको-एको फाउंडेशन, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, आम्ही मालेगावकर, गिव्ह फाउंडेशन आदींच्या वतीने देण्यात आलेले निवेदन प्रतिनधिक स्वरूपात अंजनेरी येथील जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या प्रा.जुही पेठे, वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी दिले.

यावेळी पेठे यांनी गोडसे यांना अंजनेरी हे केवळ एक गड नाही ते समृद्ध जैवविविधता जोपासणारे जिल्ह्याचे वैभवशाली राखीव वन आहे. या वनात अशा काही औषधी वनस्पती आहेत की त्या केवळ येथेच आढळून येतात. जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणारे लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाडांचा हक्काचा अधिवास आहे, यामुळे हे वन कायमस्वरूपी सुरक्षित करण्याची गरज असल्याचे सांगत महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोडसे यांनीदेखील मी निसर्गाच्या विरोधात नाही, मात्र विकास करण्यासाठी रस्ताही गरजेचा असल्याचे सांगितले. यावेळी जो सध्याच्या रस्ता आहे तो निम्या गडापर्यंत जातो तो अधिक चांगला करुन शाश्वत विकासाची कास धरावी असे गायकवाड यांनी यावेळी नमूद केले. यावेळी याबाबत नक्कीच फेरविचार करु आणि सविस्तर चर्चा सर्वांना सोबत घेऊन करण्याचे आश्वासन गोडसे यांनी दिले. निवेदनांवर विविध स्वयंसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकHemant Godseहेमंत गोडसेanjenriअंजनेरीNatureनिसर्गforest departmentवनविभाग