नव्या पिढीने अनुभवाचा लाभ घ्यावा : जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:15 AM2019-06-03T00:15:24+5:302019-06-03T00:15:46+5:30

‘प्रॅक्टिकल हिट्स फॉर क्रिमिनल’ हे पुस्तक वकिलांच्या नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या पिढीने या अनुभवाचा लाभ घ्यावा़ न्यायालयात दाखल होणाऱ्या विविध खटल्यांमधील युक्तिवादातून कसे अनुभव शिकायला मिळतात, याचे कथन भिडे यांनी या पुस्तकातून केल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व मॅटचे अध्यक्ष अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.

 Take advantage of new generation experience: Joshi | नव्या पिढीने अनुभवाचा लाभ घ्यावा : जोशी

नव्या पिढीने अनुभवाचा लाभ घ्यावा : जोशी

Next

सिडको : ‘प्रॅक्टिकल हिट्स फॉर क्रिमिनल’ हे पुस्तक वकिलांच्या नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या पिढीने या अनुभवाचा लाभ घ्यावा़ न्यायालयात दाखल होणाऱ्या विविध खटल्यांमधील युक्तिवादातून कसे अनुभव शिकायला मिळतात, याचे कथन भिडे यांनी या पुस्तकातून केल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व मॅटचे अध्यक्ष अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.
जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश भिडे लिखीत‘प्रॅक्टिकल हिट्स फॉर क्रिमिनल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिडकोमधील गौरीशंकर मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जोशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ विधीज्ञ दौलतराव घुमरे, गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल, अ‍ॅड. सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जोशी म्हणाले, भिडे यांचे पुस्तक शैक्षणिक अभ्यासक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा दैनंदिन कामकाजात कसा वापर करावा, हे शिकविणारे आहे, असेही जोशी यावेळी म्हणाले. तर आपल्या अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा, या उद्देशाने पुस्तकाचे लिखाण केले आहे. समाजात वकिलांनी प्रतिमा कशी जपावी याबाबतही काही टिप्स दिल्याचे लेखक या नात्याने भिडे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन अ‍ॅड. परिक्षीत पटवर्धन यांनी केले.

Web Title:  Take advantage of new generation experience: Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.