शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:07 IST

३० जानेवारी रोजी अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी अलीगड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून शौर्य दिवस साजरा केला. याच दिवशी नथुराम गोडसेनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. देशासाठी बलिदान देणा-या राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी शौर्य दिवस साजरा केला

ठळक मुद्देकॉँग्रेसची मागणी : देशात हिंसा घडविण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात श्रद्धांजली वाहिली जात असताना अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विकृत कृत्याने देशाची मान शरमेने झुकवल्याचा आरोप करून सोमवारी कॉँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३० जानेवारी रोजी अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी अलीगड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून शौर्य दिवस साजरा केला. याच दिवशी नथुराम गोडसेनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. देशासाठी बलिदान देणा-या राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी शौर्य दिवस साजरा केला जातो. मात्र विकृत कार्यकर्त्यांनी वरील संबंधित प्रसंग पुनर्जीवित करण्याचा घाट घातला जातो हे दुर्दैवी असून, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास गोळ्या घातल्या हे कृत्य देशाला घातक आहे. अशा लोकांना अटक करून देशामध्ये लोकशाही आहे. हुकूमशाही नाही हे सरकारने सिद्ध करावे. तसेच विध्वंसक मनुवृत्तीच्या विचाराच्या लोकांचा देशामध्ये पुन्हा हिंसा घडवण्याचा हा अप्रत्यक्षरीत्या दाखविण्याचा डाव आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, शहर अध्यक्ष शरद आहेर, हेमलता पाटील, विजय राऊत, ज्ञानेश्वर काळे, सुनील आव्हाड, लक्ष्मण जायभावे, मीरा साबळे, सुरेश मारू, राजकुमार जेफ, नीलेश (बबलू) खैरे, कैलास कडलग, विजय पाटील, उद्धव पवार, उत्तम भोसले, संतोष ठाकूर, अण्णा मोरे, रोहन कातकाडे, जितेंद्र बराथे, अशोक रोडगे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस