नाशिक : एका पादचारी ज्येष्ठ महिलेची भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन मंगळसूत्र लांबविल्याची घटना जुने सीबीएस परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे.मीराबाई बाळू बोडके (रा.तळवाडे) या कामानिमित्त शहरात आल्या होत्या. यावेळी त्या काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाल्या असता बसस्थानकाच्या आवारात दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत विश्वास संपादन करून बोडके यांना सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखविले. यावेळी बिस्किटे खरेदी करण्याबाबत आग्रह बोडके यांच्याकडे धरला. यावेळी त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले; मात्र चोरट्यांनी ‘गळ्यातील मंगळसूत्र द्या, आम्ही बिस्किटे देतो’ असे सांगून महिलेला मंगळसूत्र मिळविले आणि बनावट सोन्याचे बिस्किटे त्यांच्या हाती देऊन पोबारा केला.
बनावट सोन्याचे बिस्किट देऊन मंगळसूत्र लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:39 IST
नाशिक : एका पादचारी ज्येष्ठ महिलेची भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन मंगळसूत्र लांबविल्याची घटना जुने सीबीएस परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे.
बनावट सोन्याचे बिस्किट देऊन मंगळसूत्र लांबविले
ठळक मुद्देबनावट सोन्याचे बिस्किट देऊन मंगळसूत्र लांबविले घटना जुने सीबीएस परिसरात घडल्याचे उघडकीस