शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या महासभेवर तहकुबीची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:30 IST

अखेरची महासभा..! महापौरांच्याच नव्हे तर सर्वच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहते, ती सभेतील गोडवा नव्हे तर अखेरच्या सभेत बºया-वाईट प्रस्तावांच्या असणाºया भरण्यामुळे. कोणतेही सोयीचे आणि गैरसोयीचे प्रस्ताव महापौरांच्या अखेरच्या महासभेत होतात.

नाशिक : अखेरची महासभा..! महापौरांच्याच नव्हे तर सर्वच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहते, ती सभेतील गोडवा नव्हे तर अखेरच्या सभेत बºया-वाईट प्रस्तावांच्या असणाºया भरण्यामुळे. कोणतेही सोयीचे आणि गैरसोयीचे प्रस्ताव महापौरांच्या अखेरच्या महासभेत होतात. यंदा अशी सभेची संधी आली. महापौरांनी तर अखेरची सभा संस्मरणीय करण्यासाठी भोजनाचा घाट घातला म्हणे, परंतु दुर्दैव अखेरची सभाच तहकूब करण्याची वेळ महापौर रंजना भानसी यांच्यावर येणार आहे.महापालिकेची किंवा स्थायी समितीच्या सभापतींची अखेरची सभा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याचे कारण शेवटच्या सभेत संबंधित पीठासन अधिकाऱ्यांना वाटणारे सोयीचे विषय घुसवले जातात. यात आरक्षणे उठवण्यापासून, ज्यादा दराची कामे मंजूर करणे, प्रशासन किंवा खाते प्रमुखांच्या सोयीचे प्रस्ताव मंजूर करणे असे अनेक विषय असतात. अत्यंत लाभाची कोणती सभा असेल तर ती अखेरची सभा. सत्तारूढ आणि विरोधक अशा अखेरच्या सभेत महापौरांचे गुणगान करतात आणि सहसा चुकीच्या कामालादेखील विरोध करत नाही. महापौरदेखील सर्वांच्या सहकार्यामुळे कसे (सोयीचे) काम करता आले त्याबद्दल कौतुक करतात. कोणाचा विरोध नाही की अडवणूक नाही. त्यामुळे अखेरची सभा खेळीमेळीत पार पडते.महापौर रंजना भानसी यांच्या नशिबी मात्र असे गुणगान नाही. त्यांची मुदत १५ डिसेंबर रोजी संपणार होती. त्यामुळे मंगळवारी (दि.१९) होणारी ही एकच सभा नव्हे तर आणखी काही विषयांसाठी त्या सभा घेऊ शकत होत्या आणि सामान्यपणे मावळते महापौर अशा सभा घेतातच, परंतु शासनाचा २२ आॅगस्टचा एक अध्यादेश आड आला आणि सर्वच संपले. आरक्षणाच्या सोडतीनंतर अवघ्यासात दिवसांत निवडणूक घ्यावी लागली. त्यामुळे महापौरांचा पक्ष असलेल्या भाजप बरोबरच बहुतांशी विरोधी पक्ष सहलीवर गेलेलेआहेत. त्यामुळे गणसंख्याच पूर्णझाली नाही तर सभा घेता येणार नाही की कोणताही प्रस्ताव मंजूर होणार नाही.सभेचा अनोखा विक्रममहापौरांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा करण्याची नामुष्की आजपर्यंत कधी आली नव्हती. १९९२ पासून आत्तापर्यंत कधीही असे घडले नव्हते. मात्र हा विचित्र योग किंबहुना अखेरची सभा तहकूब करण्याचा विक्रम रंजना भानसी यांच्या नावावर लागणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौर