ताहाराबाद/जायखेडा : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे सरकारी दवाखान्यामागे झोपडीत राहणाऱ्या आठ वर्षाच्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. काल पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलीने फिर्याद दिली. सदर मुलगी वडिलांसमवेत झोपडीसमोर अंगणात झोपली असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला उचलून नेऊन मारहाण व बलात्कार करून पळून गेला. याप्रकरणी लहान मुलांचे लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
ताहाराबादला बालिकेवर बलात्कार
By admin | Updated: June 17, 2014 00:15 IST